मुंबई - दिल्लीत भाजप नेते वरूण गांधी यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut comment on Varun Gandhi visit ) यांची भेट घेतली. या घटनेने राज्यात विविध राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. मात्र, या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, ती सदिच्छा भेट असल्याचे म्हटले. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - Home Minister On Bjp : लोकांमध्ये फूट निर्माण करण्याचे भाजपचे राजकारण
नेमके काय म्हणाले राऊत? : भाजप नेते वरूण गांधी भेटायला आले होते. ही एक सदिच्छा भेट होती. आम्ही अनेक विषयांवर चर्चा केली. ते चांगले लेखक आहेत. राजकीय विषय चर्चेत निघत असतात. वरूण गांधी आणि त्यांच्या परिवाराचे ठाकरे परिवाराशी घनिष्ठ संबंध आहेत. यापुढे आम्ही भेटणार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेने विकासाला कधीही खीळ घातली नाही : राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी शिवसेनेने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी माझी भेट घेतली. त्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू, अशी भूमिका मांडली होती. समृद्धी महामार्गादरम्यान ज्या ठिकाणी जलप्रकल्प आहेत त्या ठिकाणी हा प्रकल्प झाला, तर त्याचा फायदा महाराष्ट्राला आणि विदर्भाला होईल. या संदर्भात आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे. विदर्भात हा प्रकल्प होऊ शकतो का? हे पाहण्यासाठी एक समिती नेमण्याची आशिष देशमुख यांनी मागणी केली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष कराव : शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे या भूमिकेचे आम्ही नेहमीच स्वागत केले आहे. विरोधी पक्षाची एकजूट जर आपल्याला करायची असेल, बिगर भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री यांना एकत्र आणायचे असेल, तर हे काम शरद पवार नक्कीच करू शकतात, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा - BJP on Azan Sound : मशिदीवरील लाऊड स्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण, भाजपचे मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र