ETV Bharat / city

'तेव्हा राणा दाम्पत्याची चौकशी का केली नाही?' संजय राऊत यांचा ईडीला सवाल

राऊत यांनी मंगळवारी ट्विट करत दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या युसुफ लाकडवाला याच्याकडून राणा दाम्पत्याने 80 लाखाचं कर्ज घेतल्याचा हा आरोप होता. यासंदर्भात आज पुन्हा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ED ने राणा दांपत्याची चौकशी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Apr 27, 2022, 11:33 AM IST

मुंबई - राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दांपत्याचा आता आणखी एक कारनामा संजय राऊत यांनी पुढे आणला आहे. राऊत यांनी मंगळवारी ट्विट करत दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या युसुफ लाकडवाला याच्याकडून राणा दाम्पत्याने 80 लाखाचं कर्ज घेतल्याचा हा आरोप होता. यासंदर्भात आज पुन्हा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ED ने राणा दांपत्याची चौकशी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

'तेव्हा राणा दाम्पत्याची चौकशी का केली नाही?'

काय म्हणाले राऊत? - युसूफ लकडावाला याला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. तो अटकेत असताना त्याच्या अकाउंट मधून ज्या ज्या लोकांना पैसे गेले अथवा ज्यांनी ज्यांनी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केले त्या सर्वांची चौकशी झाली. मग या राणा दाम्पत्यालाच का सुट दिली? युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणाच्या खात्यात आहे. मग ED ने ही सूट का दिली?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

अंडरवर्ल्डच्या मदतीने 92 प्रमाणे दंगलींचा कट? - ज्याप्रमाणे 1992 मध्ये अंडरवर्ल्ड व पाकिस्तानच्या मदतीने दंगली घडविण्याचा प्रयत्न झाला, तसाच काहीसा प्रयत्न आता सुद्धा होताना दिसतोय. एकीकडे भोंग्याचे राजकारण केले जातेय, हनुमान चालीसाचे राजकारण केले जातेय आणि इथल्या लोकांची माथी भडकवली जात आहेत. आता ही जी माथी भडकवणारी लोक आहेत त्यांचं अंडरवर्ल्डचे असलेल्या संबंध समोर येतोय. यांचे अंडरवर्ल्डच्या व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार आहेत. त्यामुळे हे व्यवहार फक्त आर्थिकच आहेत की आणखी काही संबंध आहेत? याची चौकशी होणे गरजेचे आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी का केली नाही? हा युसूफ लाकडवाला ज्या वेळी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होता त्यावेळी त्यांनी या राणा दाम्पत्याची चौकशी का केली नाही? या अधिकार्‍यांवर कुणाचा दबाव होता का? नसेल तर या राणा दाम्पत्याला का सूट देण्यात आली? याची देखील सखोल चौकशी आता झाली पाहिजे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.