मुंबई - महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होईल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील चित्र स्पष्ट होईल. आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद जरी दिले, तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भांडूप येथील पत्रकार परिषेत मांडली.
हेही वाचा... आज आघाडीच्या मित्रपक्षांसह शिवसेनेसोबत चर्चा करणार - पृथ्वीराज चव्हाण
पुढील पाच वर्षे राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. या निर्णयावर तिन्ही प्रमुख पक्षांची चर्चा झाली असून त्यांनी सहमतीही दर्शवली आहे. शिवसेनेने हा निर्णय स्वाभिमानाने घेतला आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे. लवकरच महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व मिळेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी राज्यातील जनतेची आणि लाखो शिवसैनिकांची इच्छा आहे. ते राज्यातील जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या भावना समजून घेऊन त्याला मान देतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-
Sanjay Raut, Shiv Sena: Shiv Sena Chief Minister will be there for full 5 years. #Maharashtra pic.twitter.com/RDt8hXCC11
— ANI (@ANI) November 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Sanjay Raut, Shiv Sena: Shiv Sena Chief Minister will be there for full 5 years. #Maharashtra pic.twitter.com/RDt8hXCC11
— ANI (@ANI) November 22, 2019Sanjay Raut, Shiv Sena: Shiv Sena Chief Minister will be there for full 5 years. #Maharashtra pic.twitter.com/RDt8hXCC11
— ANI (@ANI) November 22, 2019
हेही वाचा... ७० वर्षात देश विकला असं म्हणणाऱ्यांनीच देश विकायला काढला, धनंजय मुंडेंचा निशाणा
शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार, असे उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी दसरा मेळावा किंवा इतर सभा, रॅलीमध्ये शिवसैनिकांना उद्देशून म्हटले होते. ती वेळ आता आली असून राज्यातील जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्याचे पाहायला मिळेल. मुख्यमंत्री अडीच वर्षांचा की पाच वर्षांचा, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सर्वच प्रश्न जर माध्यमांसमोर मांडले तर मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी काही राहणार नाही. मात्र, हे निश्चित आहे की पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल.
हेही वाचा... खासगीकरण : तीन कंपन्या सरकारच्या 'गिनिपिग'..
तिन्ही (काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना) पक्षांची सहमती झाली असून आता भाजप अथवा कोणीही कोणताही प्रस्ताव दिला असला, तरी त्याचा फायदा नाही. शिवसेनेने स्वाभिमानाने मुख्यमंत्री पदाचा हक्क निर्माण केला आहे. तसेच यापुढे दिल्लीतून काही होणार नाही, महाराष्ट्राची कुंडली ही महाराष्ट्रातच बनेल, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
हेही वाचा... 'राष्ट्रपती राजवटीच्या आडून मुंबईला केंद्रसशासित प्रदेश बनवण्याचा प्रयत्न'
आता कोणी आम्हाला इंद्राचे आसन जरी दिले तरी नको आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लवकरच समाप्त करू. उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आणि मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडूनही उद्धव ठाकरे यांचेच नाव समोर केले आहे. आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व आहे, पण महाआघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांनाच पसंती दिल्याचे संजय राऊत म्हणाले.