मुंबई - शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या सडेतोड भूमिका मुखपृष्ठ असलेल्या दैनिक सामनातून येत्या दोन दिवसात ( Sanjay Raut on uddhav Thackerays interview ) मांडली जाणार आहे. राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष असतानाच उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा टीझर आज प्रदर्शित झाला आहे. ठाकरे यांनी 'हम दो एक कमरे में बंद है, अशा शब्दांत सरकारचे वर्णन केले आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीतून उद्धव ठाकरे ( Sanjay Raut Teaser ) देणार आहेत.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन बंडखोरी ( Rebel in Shivsena ) केली. महाविकास आघाडी सरकार यामुळे गडगडले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडणाऱ्या बंडखोर नेत्यांकडून आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर टीका केली जात आहे. सध्या आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल सुरू केला.
-
भाग:२
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
खणखणीत मुलाखत!
सामना.
"उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?"
२६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGse
">भाग:२
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022
खणखणीत मुलाखत!
सामना.
"उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?"
२६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGseभाग:२
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 25, 2022
खणखणीत मुलाखत!
सामना.
"उध्दव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?"
२६ आणि २७ जुलै pic.twitter.com/RQ15tNEGse
येत्या २६ आणि २७ जुलैला भूमिका स्पष्ट - बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे जाब विचारत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सर्व राजकीय घडामोडींवर येत्या २६ आणि २७ जुलैला भूमिका स्पष्ट करणार आहेत. या मुलाखतीचा पहिला टीझर संजय राऊत यांनी नुकताच ट्विट केला होता. या टीझरची जोरदार चर्चा असतानाच आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी दुसऱ्या टिझर ट्विट केला आहे. दुसऱ्या टिझरमुळे उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्कंठा वाढली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दुसरा टिझर ट्विट करताना, भाग :२, खणखणीत मुलाखत!
सामना. ''उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?" २६ आणि २७ जुलै.
काय आहे व्हिडिओमध्ये
राऊत :- मुंबईचा घात करणारी योजना आपल्याला दिसते का?
उद्धव ठाकरे :- हम तुम एक कमरे में बंद हो, अस सरकार आहे. और चाबी खो जाय..
राऊत :- मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती का?
ठाकरे :- माझ्या मनात काय पाप नव्हते?
राऊत :- विरोधकांच्या मनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.?
ठाकरे :- मला एका गोष्टीचे समाधान नक्कीच आहे, अडीच वर्ष थेट मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली.
राऊत :- फुटीर लोकांनी आपल्याला विनंती केली आहे आम्हाला गद्दार म्हणू नका..?
ठाकरे :- माझा हेतू तो नव्हता, मी मुख्यमंत्री होईल, मी बोललो नाही. वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून गप्प बसेल..
सडेतोड प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे या मुलाखतीतून देणार-राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. हिंदूत्वाचा मुद्दा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यामुळे काम करण्यात अडचणी येत होत्या, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता. खासदारांनीही शिवसेनेच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, शिंदे गटात सामील झाले. आता सत्तापालट झाल्यानंतरही बंडखोर आमदारांनी ठाकरे यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सडेतोड प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे या मुलाखतीतून देणार आहेत. त्यामुळे उद्या प्रदर्शित होणारया मुलाखतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा-Nitin Gadkari on Political Career : राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या - नितीन गडकरी