पणजी (गोवा) - मुंबईत झालेले आंदोलन हे सरकारच्या काही विभागांचे अपयश असून या आंदोलनाची माहिती नसणे हे त्यांचे दुर्दैव असल्याचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Student Agitation ) यांनी सांगितले. हे आंदोलन भडकवायला मुंबईतील आणि राज्यातील काही पक्ष कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा गरिबांचा गळा घोटणारा -
बजेटमध्ये मोदी धांदडग्यांना उभारी देणार मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा गरिबांचा गळा घोटणारा अर्थसंकल्प आहे. यातुन गरिबांचे वाटोळे केले जाणार असून मोजक्याच धनदंडग्यांचा उद्धार केला जाणार आहे, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढविणार -
2022 च्या निवडणुकीत शिवसेना उत्तर प्रदेशात 50 जागा लढविणार असून 2027 च्या निवडणुकीत आम्ही सर्वच जागा लढविणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.