ETV Bharat / city

Sanjay Raut : राफेल पेक्षा राज्यपालांचा स्पीड अधिक; संजय राऊतांचा कोश्यारींना टोला - sanjay raut on floor test

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला आहे. राज्यपालांनी जो स्पीड दाखवलाय तो मोदींच्या राफेल पेक्षाही अधिक आहे, असे राऊत यांनी म्हटलं ( Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari ) आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 29, 2022, 10:04 AM IST

Updated : Jun 29, 2022, 12:39 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात आता बदल होणार काही प्रमाणात स्पष्ट होऊ लागले आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ( 28 जून ) रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. तसेच, हे सरकार अल्पमतात असल्याने विशेष अधिवेशन बोलवून बहुमत सिद्ध करण्यास सांगावे असे पत्र दिले. त्यावर आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"तर त्यांना माझ्या शुभेच्छा"- संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद देखील भूषवलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांनी हे सरकार पाडण्याची भूमिका राहिली आहे. त्यासाठी मागच्या अडीच वर्षात त्यांनी अथक प्रयत्न केले. या सर्व घडामोडींवर जर त्यांना वाटत असेल आपल्या स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आलेला आहे, तर आम्ही शुभेच्छा देतो.

संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

"राफेल पेक्षा राज्यपालांचा स्पीड अधिक" - मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटले. या भेटीनंतर लगेचच बुधवारी राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलवण्याचे जाहीर केले. यावर बोलताना राऊत यांनी म्हटलं, ते राज्याचे राज्यपाल आहेत. त्यांना कोणीही भेटू शकतं. पण, त्यांनी जो काही निर्णय घेण्याचा स्पीड दाखवलाय तो मोदींच्या राफेल पेक्षाही अधिक आहे. अडीच वर्ष 12 आमदारांची यादी थांबवलीय, हे याचसाठी होतं का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला ( Sanjay Raut On Bhagatsingh Koshyari ) आहे.

"आमचे लोक न्यायालयात जातील" - आम्ही राज्यपालांचा आदर करतो. त्यांच्यावर कोणाचा दबाव असेल. पण, असं अचानक अधिवेशन बोलावलं जात असेल तर ते योग्य नाही. हे सर्व आमची लीगल टीम पाहिल. 16 आमदार निलंबनाचा विषय न्यायालयात आहे. न्यायालयाने सांगितलंय 11 तारखेपर्यंत थांबा. तोपर्यंत काही अनधिकृत झालं तर आमच्याकडे या. मात्र, भाजप आणि राज्यपाल भवन न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवत आहे. आमचे लोक सर्वोच्च न्यायालयात जाऊन न्याय मागतील. आम्ही कायद्याने बोलतो, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीची अग्निपरीक्षा, बहुमत चाचणीसाठी राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated : Jun 29, 2022, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.