मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. ही केवळ कौटुंबिक भेट असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच, महाविकास आघाडी सरकार भक्कम असून, कोणावर कितीही आरोप केले, तरी या सरकारचा एकही खिळा पडणार नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे नेते सध्या आरोपांच्या घेऱ्यामध्ये सापडले आहेत. धनंजय मुंडे नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधकांकडून होऊ लागली आहे. महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी बॅटिंग केली आहे.
तर आम्ही पंतप्रधानांचा दररोज राजीनामा मागितला पाहिजे..
राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असंच जर असेल, तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागितला पाहिजे. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे. असे राऊत म्हणाले. तसेच, प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. या आरोपांमुळे महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : तुर्तास दिलासा! धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत निर्णय