ETV Bharat / city

Patra Chawl Scam Case : संजय राऊतांनी बेहिशेबी रक्कम गुंतवली चित्रपट आणि मद्य कंपनीत; स्वप्ना पाटकर यांची ईडीला माहिती - Directorate of Enforcement

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत ( Shiv Sena leader and MP Sanjay Raut ) यांच्यावर गेल्या आठवड्यात ईडीने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले ( ED filed supplementary charge sheet ). पत्राचाळ घोटाळ्यातील ( Patra Chawl Scam Case ) प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर ( Swapna Patkar ) यांनी सक्तवसुली संचालनालयाला जबाब दिला.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Sep 21, 2022, 12:45 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena Leader Sanjay Raut ) यांनी बेहिशेबी रक्कम त्यांचे नातेवाईकांच्या नावाने स्थापन केलेल्या बनावट कंपन्यांच्या खात्यात वळविल्याची माहिती राऊत यांची माजी सहकारी आणि पत्राचाळ घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार स्वप्ना पाटकर ( Swapna Patkar ) यांनी सक्तवसुली संचालनालयाला दिलेल्या जबाबमध्ये म्हटले आहे. पत्राचाळ घोटाळ्यात ( Patra Chawl Scam Case ) आरोपी असलेले शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गेल्या आठवड्यात ईडीने पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले. या दोषारोपपत्रात ( ED filed supplementary charge sheet ) पाटकर यांचा जबाब जोडण्यात आला आहे.

बेहिशेबी पैसे बनावट कंपन्यांत गुंतवले : स्वप्ना पाटकर यांनी दिलेल्या जबाबमध्ये असे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी राऊटर्स एन्टरटेन्मेंट एलएलपीची स्थापना केली. या कंपनीने ठाकरे चित्रपटाची निर्मिती केली. या कंपनीत त्यांनी बेहिशेबी रक्कम वळविली होती. तसेच त्यांना मद्य कंपनीतही रस होता. त्यांनी 2021 मध्ये एक मद्य कंपनी घेतली. याव्यतिरिक्त राऊत यांनी बेहिशेबी पैसे त्यांचे कुटुंबीय आणी सहकाऱ्यांच्या नावे काढलेल्या बनावट कंपन्यांत गुंतवले, असे पाटकर यांनी ईडीला जबाबात सांगितले.

बाळकडू चित्रपट आणी 50 लाख : मी कोणत्याही कंपनीशी संलग्न नाही. माझी पत्नी आणि मुलगी एन्टरटेन्मेंट कंपनी चालवित असल्याचे राऊत यांनी ईडीला चौकशीत सांगितले आहे. जानेवारी 2015 मध्ये बाळकडू नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाद्वारे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यात आली होती. कोणत्याही नफ्याची अपेक्षा न करता या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. तरीही या चित्रपटाने 60 लाखांचा नफा कमावला. संजय राऊत यांनी चित्रपट निर्मितीत कोणतेही योगदान न देता माझ्याकडून त्यांच्या नावे 50 लाखांचा धनादेश घेतला अशी माहितीही पाटकर यांनी दिली.

रक्कम वळती करण्यासाठी केली जमीन खरेदी : संजय राऊत यांनी बेहिशेबी रक्कम वळती करण्यासाठी त्याच ठिकाणी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि अन्य कुटुंबीयांच्या नावे जमीन खरेदी केली. एका जमीनमालकाला त्याची जमीन विकण्यासाठी राऊत यांनी धमकावल्याचे सुजित यांनी सांगितल्याचे पाटकर यांनी म्हटले आहे. स्वप्नापाटकर यांनी २००८ ते २०१४ पर्यंत शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये स्तंभलेखक म्हणून काम केले होते. सामना मध्ये काम करत असताना कार्यालयात प्रवीण राऊत अनेकवेळा यायचा आणि तो रोख रक्कम संजय राऊत यांना द्यायचा असेही पाटकर यांच्या जबाबात नोंदवले आहे.

किंमत कमी दाखवून घेतल्या जमिनी : अलिबागमधील मालमत्तेबाबत विचारणा केल्यानंतर त्या म्हणाल्या, सर्व मालमत्ता २०१०-२०१२ दरम्यान खरेदी करण्यात आली. वेगवेगळ्या जमीन मालकांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या. त्यावेळी त्यांचे नोंदणी मूल्य एक कोटी रुपये होते. मात्र कमीत कमी किंमत दाखविण्यात आली आणि राऊत यांनी सर्व व्यवहार रोखीने केले. राऊत हे अलिबागचेच असल्याने ते मालकांना जबरदस्तीने जमीन विकण्यास भाग पाडत. त्यांनी विकत घेतलेल्या जमिनींची किंमत 9 ते 10 कोटी रुपये आहे. मात्र नोंदणी किमत केवळ 51 लाख रुपये दाखविण्यात आली.

पाटकर यांनी ईडीला दिली अशी माहिती : जमिनीचे व्यवहार रोखीने झाले, याची माहिती तुम्हाला कशी ? असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाटकर यांना केला. माझे पती सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्यावतीने सर्व जमीनमालकाशी रोख रकमेच्या व्यवहाराबाबत समन्वय साधत होते. जमीनमालक व माझ्या पतीमध्ये झालेल्या अनेक चर्चाची मी साक्षीदार आहे अशी माहिती पाटकर यांनी ईडीला दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.