मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांनी किरीट सोमय्या यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीवरदेखील आरोप केले होते. त्यावर सोमय्या दाम्पत्य आक्रमक झाले होते. त्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीने मानहानीची तक्रार ( Defamation suit by Kirit Somayya wife ) न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आता न्यायालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांना याचिका नोंदवण्यासाठी शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी हजर राहण्याचे ( Sanjay Raut Directed Appear in Shivdi Court ) निर्देश दिले आहेत.
संजय राऊतांना न्यायालयाचे निर्देश : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीने डॉ. मेघा सोमय्या यांनी मानहानीची तक्रार न्यायालयात दाखल केली होती. या दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीत याचिका नोंदवण्यासाठी शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना 6 ऑगस्टला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नीने डॉ. मेघा सोमय्या दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीत याचिका नोंदवण्यासाठी शिवडी महानगर दंडाधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 6 ऑगस्टला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
संजय राऊत यांनी केले होते आरोप : किरीट सोमय्या यांनी कुटुंबांच्या संस्थेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. मिरा- भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी काही कोटींचा घोटाळा झाला आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. तसेच ही मंडळी कुठे कुठे पैसे खातात पहा. विक्रांतपासून ते इथपर्यंत असा टोला राऊत यांनी लगावला होता. सोमय्या आणि त्याचे कुटुंब युवा प्रतिष्ठान नावाची संस्था चालवत होते. त्यांनी केलेल्या या शौचालय घोटाळ्याची कागदपत्रे पाहून हसायला आले. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करून निर्माण केलेले शौचालय, पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल, अस संजय राऊत म्हणाले होते.
किरीट सोमय्या यांनी केला होता मानहानीचा दावा : सोमय्या म्हणाले की, हा मानहानीचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी केला आहे. दोन वर्षांपासून महा विकास आघाडी सरकारमधील नेते व मंत्री यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर काढण्याचे काम सातत्याने करत आहेत. त्यातच माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे कारागृहात आहेत,ठाकरे सरकार मधील एक डझन मंत्री व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. मी कुठल्याही चौकशीला तयार असून संजय राऊत यांच्या वरील मानहानीचा खटला हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Voting For President Election Today : राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा आहेत उमेदवार