मुंबई - केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत मेट्रो कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. मात्र, यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सल्लागार राज्य बुडवायला निघाले आहेत अशी टीका केली आहे. शासनाच्या सल्लागारांची चिंता करू नये. बिकेसी मध्ये कारशेड होऊ शकत का याची चाचपणी सुरू आहे. कारशेडबाबत विरोधकांनी चिंता करू नये असे प्रतिउत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
विरोधकांनी चिंता करू नये -
महाराष्ट्र सरकारला सल्लागाराची गरज नाही आहे. कारशेड बाबत विरोधकांनी चिंता करू नये. बीकेसी मध्ये कारशेड होऊ शकत का याची चाचपणी सुरू आहे. न्यायालयाचा अवमान कशाकरता करायचा. कारण न्यायमूर्ती च्या मागे सत्यमेव जयते लिहिलेले असते माझे लक्ष त्याकडे आहे असेही राऊत यांनी सांगितले.
कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘आरे’मध्ये कारशेड उभारणार नाही हे आधीच महाविकास आघाडीने सांगितले आहे. यामुळे दुसरी कोणती जागा आहे याबाबत पर्यायी जागेचा विचार सुरू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी एकनाथ शिंदे, अनिल परब, आदित्य ठाकरे या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यातून वांद्रे-कुर्ला संकुलात कारशेड उभारण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.