ETV Bharat / city

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा डाव, काश्मीरमध्ये महबूबा मुफ्तीसोबत भाजपचा लव्ह जिहाद होता का? - मुंबई शिवसेना बातमी

सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपने शिवसेनेवर खापर फोडणे अत्यत चुकीचे आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव आहे असी टीका भाजपवर संजय राऊत यांनी केली

शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Nov 11, 2019, 11:10 AM IST

Updated : Nov 11, 2019, 11:35 AM IST

मुंबई - सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपने शिवेवसेनेवर खापर फोडणे अत्यंत चुकीचे आहे. या उलट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव होता, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. यावेळी बोलतना त्यांनी काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती सोबत भाजपचा लव्ह जिहाद होता का?, असा पश्न विचारत भाजपवर निशाना साधला आहे. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी मिळालेला वेळ अत्यंत कमी आहे. मात्र, आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून लवकरच महाराष्ट्राला स्थीर सरकार देऊ असा विश्वासही राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत

राऊत म्हणाले, भाजपचे कालचे निवेदन खेदजनक आहे. ते सत्ता स्थापन करू शकत नाहीत, याचे खापर शिवसेनेवर फोडणे अत्यंत चुकीचे आहे. प्रसंगी आम्ही सत्ता लाथाडू पण, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद किंवा ५०-५० ट्क्के फॉर्मुल्यावर ते ठाम राहिले नाहीत, हा त्यांचा अंहकार होता. त्यांनी शिवसेनेवर खापर फोडू नये. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये.

भाजपने शिवसेना आमच्यासोबत येणार नाही आम्ही सरकार स्थापन करत नाही. असे सांगत आम्ही विरोधात बसण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले. मात्र, त्यांना त्यांचा अंहकार नडतोय ते विरोधात बसायला तयार आहेत मात्र जे ठरलेय ते करयला का तयार झाले नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला.

भाजप ठरलेल्या भूमिकेवर ठाम राहत नसून आम्हला खोटे पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही एका मंत्री पदासाठी कशासाठी केंद्रात किंवा एनडीएमध्ये एकत्र का राहायचे, असे राऊत म्हणाले. शिवसेनेसोबत ठरलेल्या गोष्टी मानायला तयार नाहीत. तर एकत्र राहण्यात काय अर्थ आहे. आमचे मंत्री राजीनामा देतात. त्यावरून तुम्ही अर्थ काढायचा तो काढा, असे म्हणत शिवसेना एनडीएतून बाहेर पडत असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.

सरकार बनवने आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी थोडा वेळ लागतोय. पण राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलायेच अशा भूमिकेत भाजप आहे. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही सरकार स्थापने साठी तयार पण आम्हाला थोडा वेळ मिळायला हवा होता. तरीही अल्पावधीत आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी पाऊले उचलत आहोत.

भाजप गेल्या काही महिन्यापासून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचे नाही हे ठरवले होते. त्यामुळे त्यांनी जे ठरलं होते ते नाकारले. राज्यात अनेक पक्ष म्हणत होते की राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही. आता त्या पक्षांनी पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. शरद पवार आणि इतर पक्षांची हीच भूमिका आहे की, महाराष्ट्रात स्थीर सरकार स्थापन करावे आणि आम्ही मिळून ते करणार आहोत,असे ही राऊत यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Nov 11, 2019, 11:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.