ETV Bharat / city

Sanjay Raut Reaction : शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी माझ्यावर कारवाई; संजय राऊतांचा ईडी कार्यालयासमोर भाजपवर हल्लाबोल

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर ( Sanjay Raut in custody of ED ) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तुमचा सामना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या सच्या शिवसैनिका सोबत आता सुरू झाला आहे. तुम्हाला सच्चा शिवसैनिक काय आहे हे तुम्हाला आता कळेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा तसेच भाजपवर ( Sanjay Raut criticizes BJP ) हल्लाबोल केला आहे.

Sanjay Raut
संजय राऊत
author img

By

Published : Jul 31, 2022, 10:25 PM IST

मुंबई - शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर ( Sanjay Raut in custody of ED ) ईडी कार्यालयात आणले. त्यावेळी राऊत यांनी पुन्हा शिवसेना स्टाईलमध्ये केंद्र सरकारला इशारा दिला आहे. तुमचा सामना बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या सच्या शिवसैनिका सोबत आता सुरू ( Shiv Sainik of Balasaheb Thackeray ) झाला आहे. तुम्हाला सच्चा शिवसैनिक काय आहे हे तुम्हाला आता कळेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा तसेच भाजपवर ( Sanjay Raut criticizes BJP ) हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत

महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी शिवसेनेला त्रास - संजय राऊत म्हणाले शिवसेनेला त्रास देण्यासाठी महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी हे सर्व दमनचक्र, दहशत सुरू आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार आम्ही लढू. महाराष्ट्र, शिवसेना इतका कमकुवत नाही. खरी शिवसेना काय आहे हे तुम्ही पाहताय. महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत झुकेंगा नही, शिवसेना पक्षही सोडणार नाही असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

बंडखोर आमदार बेशरम - यानंतर संजय राऊत ईडी कार्यालयाकडे निघाले. मात्र, तेवढ्यात पत्रकारांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ( Rebel MLA Sanjay Shirsatb ) यांनी कारवाईवर आनंद व्यक्त केल्याचं सांगत त्यावर प्रश्न विचारला. यावर अचानक मागे वळत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले पेढा वाटा, महाराष्ट्र कमकुवत होतोय. पेढे वाटा महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत, पेढे वाटा आनंद व्यक्त करणारे बंडखोर आमदार बेशरम लोक आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे अशा कडवड शब्दात त्यांनी संजय शिरसाठांचा समाचार घेतला.

हेही वाचा - Sanjay Raut Action Video : संजय राऊतांचे शक्तिप्रदर्शन; ईडी कार्यालयात पोहचताच गेले टेरेसवर; पाहा व्हिडिओ

सकाळपासून नेमकं काय-काय घडलं?- सकाळी 7.34 मिनिटांनी संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम पोहोचली. तेव्हापासून त्यांची चौकशी सुरू होती. ईडीची टीम राऊतांच्या घरी पोहोचल्यानंतर राऊत समर्थक त्यांच्या बंगल्याबाहेर गोळा झाले.

सकाळी 8.20 वाजता संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत खिडकीत आले. शिवसैनिक आणि राऊत समर्थकांनी दुपारच्या सुमारास घोषणाबाजी सुरू केली.

त्यानंतर संजय राऊत यांनी सकाळी 8.46 दरम्यान शिवसेना सोडणार नाही असं ट्वीट केलं. एकामागे एक चार ट्वीट त्यांनी केले.

त्यानंतर 9.30 वाजल्यापासून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या सगळ्यामध्ये संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून चौकशी सुरू होतीच. 10.28 च्या सुमारास संजय राऊत यांचे वकील त्यांच्या पोहोचले.

सकाळी 11.10 च्या सुमारास संजय राऊत खिडकीत आले त्यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठ्याने घोषणा देण्यास सुरुवात केली.

11.15 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर नाही त्याला डर कशाला म्हणत पहिली प्रतिक्रिया दिली.

दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला. घराबाहेर जमलेल्या शिवसैनिकांना मागे हटवण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली.

3.45- सुमारास संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्याचवेळी बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केली. याच गोंधळात संजय राऊत यांना बाहेर आणण्यात आलं. संजय राऊत यांनी त्यावेळी भगवा उपर्ण घेऊन शिवसैनिकांना अभिवादन केलं.

4. 54 च्या सुमारास त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यासाठी निघाले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात फोर्ट इथल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं.

5.30- संजय राऊत ईडी कार्यालयात दाखल तर कार्यालयाबाहेर शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी केली.
5.48- संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला, 'महाराष्ट्राला बदनाम केलं जात आहे. खोटे कागदपत्र, पुरावे गोळा करून माझ्यावर दबाव आणला जात आहे. मात्र मी झुकणार नाही, तर लढत राहणार अशी कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया दिली.
5.52- संजय राऊत यांच्या घरातील कागदपत्र ईडी कार्यलयात आणली.
5.57 - संजय राऊत यांची मुलगी ईडी कार्यालयाबाहेर आली.
6.32- संजय राऊत यांचे वकील आले

हेही वाचा - Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरातून ईडीने 11.50 लाख रुपये केले जप्त; छापेमारीदरम्यान सापडली रक्कम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.