मुंबई - राज्यात मशिदीवरील लाऊडस्पीकरचा ( Mosque Loudspeaker Controversy ) मुद्दा गाजत असताना आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi ) यांना आवाहन केले आहे. हिंमत असेल तर लाऊडस्पीकरबाबत राष्ट्रीय धोरण बनवा ( National Policy On Mosque Loudspeaker ) आणि ते संपूर्ण देशात लागू करा, अशी मागणी खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत? - लाऊडस्पीकरचा वाद तुमच्या लोकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे तुम्ही लाऊडस्पीकरबाबत राष्ट्रीय धोरण तयार करून ते संपूर्ण देशात लागू करावे. तसेच त्याची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
काय आहे प्रकरण? - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे भाषण केले होते. त्यावेळी त्यांनी भोंग्यांबाबतची ( Maharashtra loudspeaker controversy ) भूमिका मांडली होती. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापत चालले आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांनी मुंबईत पोलीस महासंचालकांची बैठक ( Meeting Between Home Minister And DGP ) घेतली. या बैठकीनंतर सुरक्षेच्या मुद्द्यावर काय पावले उचलली गेली आहेत, त्याचबरोबर येणाऱ्या दिवसात या संदर्भामध्ये कशा पद्धतीच नियोजन करण्यात आले आहे. याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. तसेच या संदर्भामध्ये सर्व राजकीय ( Dilip Walse Patil Will Hold Meeting between All Party Leader ) नेत्यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली जाणार असून यामध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना सुद्धा आमंत्रित केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
भोंग्याबाबत राज्य सरकारचाही जीआर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 2015 व 2017 साली राज्य सरकारने यासंदर्भात जीआर काढला व लाऊड स्पीकरच्या संदर्भातली जी पद्धत आहे, ती पद्धत ठरवून दिलेली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भांमध्ये सूचना संबंधितांना देण्यात येतील. परंतु या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी राज्यातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावून त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे. काही संघटनांनादेखील बैठकीला बोलावून त्यांच्या सोबत सुद्धा चर्चा करणार आहे. मग याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित केलं जाणार आहे, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले.
हेही वाचा- Maharashtra Police Officers Transfer : संदीप कर्णिक पुण्याचे नवे पोलीस सहआयुक्त