ETV Bharat / city

Sanjay Raut Allegations On BJP : …तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत; संजय राऊतांनी सुनावले - Gujarat Chief Minister Bhupendrabhai Patel

ममता यांनी राहुल गांधी हे परदेशात असतात अशी टीका केली. यावर बोलताना राऊत ( Sanjay Raut On Rahul Gandhi Foreign Visit ) यांनी काँग्रेसची बाजू सावरत राहुल गांधी परदेशात आहेत की नाही माहिती नाही. फक्त कोरोनामुळे पंतप्रधान ( PM Modi Foreign Visit ) परदेशात नाहीत इतकंच आहे. ते सुद्धा परदेशातच असतात. त्यावर कोणी टिका-टिप्पणी कोणी करु नये, असे राऊत यांनी सुनावले.

Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Dec 2, 2021, 12:33 PM IST

Updated : Dec 2, 2021, 1:38 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईचा ( Mamata Banerji Maharashtra visit ) तीन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यावर भाजपा नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना? असा सवाल शेलार ( Ashish Shelar ) यांनी केला होता. संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी ( Vibrant Gujarat ) ते रोड शो करत आहेत. भाजपाला हे चालतं का? असा उलट सवाल राऊत यांनी शेलार यांना केला आहे.

तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत

जर भारतीय जनता पक्षाचे मुंबईवर एवढे प्रेम आहे तर ते इतर वेळी कुठे जातं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. काही वर्षापूर्वी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल ( Anandiben Patel ) येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुंबईबद्दल टीका केली होती. काय इथले रस्ते, खड्डे… उद्योगपतींनो गुजरातला चला. मुंबईत काय ठेवलं आहे? सिने उद्योग लखनौला नेणार, अशी त्यांची भाषा होती. तेव्हा यांना मिरच्या का झोंबल्या नाहीत? तेव्हा तोंडाचा मुरंबा का झाला होता?” असेही राऊत म्हणाले.

त्यांना तोंडाचा डायरीया

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबईत आल्या. उद्योगपतींना भेटल्या. मुंबई औद्योगिक नगरी ( Mumbai Industrial City ) आहे. या उद्योगपतींचे देशभरात उद्योग आहेत. ते सगळीकडे उद्योग करतात. ममतांनी या उद्योजकांना म्हटलं ज्याप्रमाणे मुंबईत तुमचे योगदान आहे, त्याप्रमाणे कोलकत्ता याकडेही लक्ष द्या, यात गैर काय आहे. ममता बॅनर्जी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असे जे म्हणत आहेत, ते मूर्ख लोकं आहेत असेही राऊत म्हणाले. त्यांना आरोपांचा आणि तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

यूपीए मजबूत करण्याची गरज -

काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) ( UPA ) अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते. त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसला डिवचले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सांगितले की, जरी अस्तित्वात नाही असे म्हणतात तर एनडीएही अस्तित्वात नाही. एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल बाहेर पडले असून इतर पक्षही बाहेर पडत आहेत. एकेकाळी आम्ही एनडीएत होतो. युपीए मजबूत करण्याची गरज आहे.

पंतप्रधान परदेशात नाहीत -

ममता यांनी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे परदेशात असतात अशी टीका देखील केली. यावर बोलताना राऊत यांनी काँग्रेसची बाजू सावरत राहुल गांधी परदेशात आहेत की नाही माहिती नाही. फक्त कोरोनामुळे पंतप्रधान परदेशात नाहीत इतकंच आहे. ते सुद्दा परदेशातच असतात. त्यावर कोणी टिका-टिप्पणी कोणी करु नये, असे राऊत यांनी सुनावले.

Last Updated : Dec 2, 2021, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.