ETV Bharat / city

राहुल गांधींच्या जवळ असल्याने मला संपवण्याचा कट केला जातेय- संजय निरुपम

संजय निरुपम यांची काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांवर टीका. मी राहुल गांधींयाच्या जवळ असल्याने मला संपवण्याचा कट केला जातोय.

संजय निरुपम यांची पत्रकार परिषद
author img

By

Published : Oct 4, 2019, 2:09 PM IST

मुंबई - मी जे काही बोलत आहे ते काँग्रेसच्या फायद्यासाठी बोलतोय. मात्र, माझ्यासारखे अनेक नेते जे राहुल गांधी यांच्याजवळ होते, त्यांना संपवले जात आहे. मलाही संपवण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केला.

संजय निरुपम यांची पत्रकार परिषद

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, राहुल गांधी यांना सुद्धा असाच त्रास झाल्याने ते बाजूला झाले असल्याचा दावाही निरुपम यांनी यावेळी केला. मला लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही त्रास देण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत मला संपविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर मी पक्ष सोडून सुद्धा जाऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबई प्रदेश काँग्रेस कडून मुंबईत उभे केलेल्या उमेदवारांपैकी दोन चार उमेदवार सोडल्यास इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारचे उमेदवार देण्यात आले आहेत. काँग्रेसची अशीच परस्थिती राहिली तर काँग्रेस संपून जाईल असा इशारा देत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमुळे काँग्रेस संपत असल्याचा आरोप त्यांनी केला.

माझ्या लोकसभा मतदारसंघात मी केवळ वर्सोवा येथील एक जागा मागितली होती. मात्र, तीही जागा मला देण्यात आली नाही. दुसरीकडे निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले असल्याने या निवडणूक प्रचारात मी कोणताही सहभाग घेणार नसल्याची भूमिका ही निरुपम यांनी स्पष्ट केली.

लोखंडवाला सर्कल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी काँग्रेसला इशारा देत काँग्रेसमध्ये बसलेले लोक पक्षाला संपवत आहेत. मला आणि राहुल गांधी यांच्याजवळ असलेल्या सर्वांना बाजूला केले जात आहे. दिल्लीत जाऊन चुकीची माहिती दिली जात आहे. दिल्लीतील लोक तसे निर्णय घेतात. त्यामुळे अशी परिस्थीती राहिली तर काँग्रेस संपून जाईल. पार्टी पुन्हा उभी राहावी म्हणून मी खूप प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. दिल्लीतील लोक कोणाच्या ईशाऱ्यावर काम करतात हे शोधण्याची गरज आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही या निर्णयाची माहिती नसते जो निर्णय घेतात ते जनरल सेक्रेटरी असून त्यामुळे काँग्रेस पक्ष रसातळाला जात असल्याची भीतीही निरुपम यांनी यावेळी व्यक्त केली.

Intro:
राहुल गांधींच्या जवळ असल्याने मला संपवण्याचे षड्यंत्र केले जातेय- संजय निरुपम

mh-mum-01-con-sanjay-nirupam-byte-7201153
(फीड mojo var पाठवलं आहे)

मुंबई, ता. ४:

मी जे काही बोलत आहे ते काँग्रेसच्या फायद्यासाठी बोलतोय परंतु माझ्यासारखे अनेक नेते जे राहुल गांधी यांच्या जवळ होते त्यांना संपवले जात असून मलाही संपवण्याचे षडयंत्र केले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, राहुल गांधी यांना सुद्धा असाच त्रास झाल्याने ते बाजूला झाले असल्याचा दावाही निरुपम यांनी यावेळी केला. मला लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही त्रास देण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत मला संपविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे परिस्थिती अशीच राहिली तर मी पक्ष सोडून सुद्धा जाऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई प्रदेश काँग्रेस कडून मुंबईत उभे केलेल्या उमेदवारांपैकी दोन चार उमेदवार सोडल्यास इतर सर्वांचे डिपॉझिट जप्त होईल अशा प्रकारचे उमेदवार देण्यात आले असून काँग्रेसची ही अशीच परिस्थिती राहिली तर काँग्रेस संपून जाईल असा ईशारा देत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर काँग्रेस संपत असल्याचा आरोप केला.
माझ्या लोकसभा मतदारसंघात मी केवळ वर्सोवा येथील एक जागा मागितली होती परंतु तीही जागा मला देण्यात आली नाही.तर दुसरीकडे निर्णय प्रक्रियेत आपल्याला डावलले असल्याने या निवडणूक प्रचारात मी कोणताही सहभाग घेणार नसल्याची भूमिका ही निरुपम यांनी स्पष्ट स्पष्ट केली.
लोखंडवाला सर्कल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम यांनी काँग्रेसला इशारा देत काँग्रेसमध्ये बसलेले लोक पक्षाला संपवत आहेत, मला आणि राहुल गांधी यांच्या जवळ असलेल्या सर्वांना बाजूला केले जात आहे. दिल्लीत जाऊन चुकीची माहिती दिली जात आहे, आणि दिल्लीतील लोक तसे निर्णय घेतात, त्यामुळे अशी परिस्थीती राहिली तर काँग्रेस संपून जाईल, मात्र पार्टी पुन्हा उभी राहावी म्हणून मी खूप प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच दिल्लीतील लोक कोणाच्या ईशाऱ्यावर काम करतात हे शोधण्याची गरज आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाही या निर्णयाची माहिती नसते जो निर्णय घेतात ते जनरल सेक्रेटरी असून त्यामुळे काँग्रेस पक्ष रसातळाला जात असल्याची भीतीही निरुपम यांनी यावेळी व्यक्त केली.

Body:राहुल गांधींच्या जवळ असल्याने मला संपवण्याचे षड्यंत्र केले जातेय- संजय निरुपमConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.