मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरावे लागले. त्यानंतर पक्षात मोठी फूटही पडली. शिवसेनेला आपल्या पक्षाची निशाणी धनुष्यबाण आणि पक्षाचे नावही गमवावं लागलं. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे राज्यभरातून जनता सहानुभूतीने उभी राहिल्याचे चित्र आहे. शिवाजी पार्क मैदानावर पडलेल्या दसरा मेळाव्यात राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आले होते. मात्र आता उद्धव ठाकरे यांना मिळत असलेल्या सहानुभूतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली (Sandeep Deshpande Letter To Uddhav Thackeray) आहे.
आम्हाला कधी सहानभुती मिळणार ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत (Sandeep Deshpande write letter to Uddhav Thackeray) तुम्हाला सहानुभूती मिळते. मात्र गेली 25 वर्ष आम्ही रस्त्यावर नाही, तर खड्ड्यावरून चालत आहोत. आम्हाला कधी सहानभुती मिळणार ? असा सवाल विचारला पत्रातून (Sandeep Deshpande criticized Uddhav Thackeray) आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी हे पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिल आहे.
कशाची सहानभूती पाहिजे ? तसेच कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला ? करोना काळात लपून बसलात त्याची की, पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची ?महापौरांच्या मुलाला कोरोना काळात कंत्राट दिले त्याची सहानभूती पाहिजे ? की लोकांचे करोनामध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत परवानगी दिलीत, त्याची सहानभूती पाहिजे ? करोनामध्ये जनतेला रुग्णालयात बेड मिळत नव्हता, त्याची सहानभूती पाहिजे ? की सामान्य माणसाला हॉस्पिटल्सने बिलामध्ये लुटलं, त्याची सहानभूती पाहिजे ? रेल्वेमध्ये सामान्य माणसाला प्रवेश न देता आठ-आठ तास प्रवास करायला लावला. त्याची सहानभूती पाहिजे ? करोनामध्ये लोकांना उपाशी राहायला लागलं, त्याची सहानभूती पाहिजे ? की शिवभोजनच्या नावाखाली भ्रष्टाचार झाला, त्याची सहानभूती पाहिजे ? पत्रा चाळीच्या घोटाळ्यात शेकडो मराठी माणसं बेघर केलीत, त्याची सहानभूती पाहिजे ? बार मालकाकडून शंभर कोटी वसूल केलेत, त्याची सहानभूती पाहिजे ? की वाझेसारख्या अधिकाऱ्याला परत आणलंत, त्याची सहानभूती पाहिजे?
पत्रातून विचारले अनेक सवाल - बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात, त्याची सहानभूती पाहिजे ? की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे. त्याची सहानभूती पाहिजे ? अनधिकृत भोंग्यांविरुद्धय आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत, जेलमध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय ? की स्वतःच्याच भावाचे पुत्र अमित आजारी असताना नगरसेवक चोरलेत त्याची सहानभूती हवीय ? वरळीत-केम छो वरळीचे बोर्ड लावलेत, त्याची सहानभूती हवीय ? की चतुर्वेदींना खासदार केलंत त्याची सहानभूती हवीय ? गेली पंचवीस वर्षे महानगर पालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानभूती हवीय ? की सगळे अमराठी भ्रष्टाचारी कंत्राटदार महापालिकेत पोसलेत, त्याची सहानभूती हवीय ? उद्धव साहेब एकदा मराठी माणसाला समजून सांगाच, तुम्हाला कसली सहानभूती पाहिजे ? असे अनेक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे यांना विचारले (Sandeep Deshpande letter through social media) आहेत.