ETV Bharat / city

Sanajay raut on Maharashtra political crisis : विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी, संजय राऊत यांचे संकेत - एकनाथ शिंदे लाईव्ह अपडेट

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, की खरी शिवसेना ही रस्त्यावर आहे. ज्यांनी संघर्ष केला आहे. हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अद्यापदेखील मजबूत आहे. चार आमदार गेले दोन नगरसेवक केले म्हणजे पक्ष संपला असं होत नाही.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 23, 2022, 11:32 AM IST

Updated : Jun 23, 2022, 12:09 PM IST

मुंबई - शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे आणि विधिमंडळ हा एक स्वतंत्र पक्ष आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडून जर काही आमदार पळाले असतील विशेषतः जे स्वतःला बछडे, वाघ म्हणून घ्यायचे ते पळाले असतील तर ते म्हणजे शिवसेना नाहीत, अशी भूमिका खासदार संजय राऊत ( Sanajya raut on Maharashtra political crisis ) यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, की खरी शिवसेना ही रस्त्यावर आहे. ज्यांनी संघर्ष केला आहे. हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अद्यापदेखील मजबूत आहे. चार आमदार गेले दोन नगरसेवक केले म्हणजे पक्ष संपला असं होत नाही.

सर्व सोडून का गेले याची कारणे लवकरच समोर येतील. अजून देखील आम्ही या सर्वांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याशी बोललं करतोय. तिकडचे काहीजण आम्हाला सांगतायत आम्हाला इकडे जबरदस्तीनं आणण्यात आलंय. दोन बंडखोर परत आलेले आज पत्रकार परिषद घेऊन नितीन देशमुख आणि कैलास पाटील ते तुम्हाला सर्व हकीकत सांगतील. त्यांना इथून कसं नेण्यात आलं काय सांगण्यात आलं हे सर्व सांगतील. आणखी देखील सतरा ते अठरा आमदार भारतीय जनता पार्टीच्या कब्जात आहेत. मी स्पष्टपणे भाजपा हा शब्द वापरतो कारण त्यांच सरकार असल्या राज्यात इतक्या कडेकोट सुरक्षेत या आमदारांना डांबून ठेवणं हे भाजपच्या कारस्थाना शिवाय शक्य नाही. मुख्यमंत्री आज कोणतीही आणि कोणासोबतही बैठक घेणार नाहीत. ते मातोश्रीवरतीच आहेत. फक्त आमचे काही आमदार काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी वर्षावर जातील.

देशमुख आणि पाटील हे साधारण साडे बाराच्या आसपास पत्रकार परिषदेत घेणार आहेत. ही पत्रकार परिषद शिवालय किंवा वर्षा निवासस्थानी होऊ शकते.

Last Updated : Jun 23, 2022, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.