मुंबई : मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे ( NCB Zonal Director Sameer Wankhede ) यांचा 31 डिसेंबर रोजी मुंबई झोनल डायरेक्टर पदाचा शेवटचा दिवस होता. तरी सुद्धा समीर वानखेडे यांनी 31 डिसेंबर रोजी गोव्यात मोठी कारवाई ( Major operation in Goa on 31st December )केली आहे. या कारवाईत दोन ड्रग्ज तस्करांना अटक ( Two drug smugglers arrested ) केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याची किंमत लाखो रुपयांच्यावर आहे. 31 डिसेंबरच्या पार्टीला अनेक ठिकाणाहून ड्रग्ज येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळेच एनसीबीने सगळीकडे आपले धाडसत्र सुरू ठेवले होते. यामध्ये अनेक ठिकाणी मोठा ड्रग्ज साठा सापडला आहे.
31 डिसेंबरच्या पार्टीचे ( 31st December Party Goa ) सर्वात जास्त आकर्षणाचे ठिकाण गोवा आहे. त्यामुळे एनसीबीने गोव्यावरही करडी नजर ठेवली होती. गोव्यामध्ये केलेल्या कारवाईमध्ये एनसीबीने 1 किलो गांजा , 49 टॅबलेट, 25 ग्राम अफेटामाईन, 2.2 ग्राम कोकेन, 1 ग्राम MDMA पावडर आणि 1030 किलो गांजा पकडण्यात आला आहे. यामध्ये दोन महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक केलेल्या दोन महिलांपैकी एक परदेशी नागरिक आहे. तर दुसरी महिला येतील स्थानिक आहे. परदेशी महिला ही ड्रग्स सप्लाय करायची तर स्थानिक महिला ही ड्रग्स विक्री करत होती. या परदेशी महिलेचा मोठ्या ड्रग्स टोळीशी संबंध असल्याचाही संशय एनसीबीला आहे. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी अनेक देशभरासह जगभरातून पर्यंटक गोव्यात दाखल होतात. त्यामुळे गोवा हे पार्टीसाठी फेवरेट स्थळ मानले जाते. अशा पर्यटकांना टार्गेट करत अनेक ड्रग्ज सप्लायर आणि ड्रग्ज विक्रेते गोव्यात सक्रिय होता. त्यांना आवर घालण्यासाठी एनसीबीने हा कारवाईचा धडाका लावला होता.
समीर वानखेडे यांची गोव्यात मोठी कारवाई ; लाखो रुपयांच्या ड्रग्ज सह दोन आरोपींना अटक - एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे
31 डिसेंबर रोजी समीर वानखेडे ( Sameer Wankhede )आणि मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोव्यात मोठी कारवाई ( NCB's big action in Goa ) केली आहे. या कारवाईत एनसीबीने दोघांना अटक करत लाखो रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे.