ETV Bharat / city

Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडे यांना पुन्हा चौकशीसाठी दिल्लीत हजर होण्याचे आदेश - किरण गोसावी

क्रुझ ड्रग्ज पार्टी ( Cruise Drugs Party ) प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ( Aryan Khan Case ) अटक केल्यानंतर या प्रकरणात तत्कालीन तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांसह या प्रकरणातील पंच असलेल्या व्यक्तींनी देखील आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या ( Aryan Khan Drugs Case ) तपासासाठी दिल्लीतील एनसीबी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाला एसआयटीची ( Special Investigative Team ) स्थापना करत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. आता या चौकशी पथकाकडून चौकशी पूर्ण झाले असून अंतिम चौकशीसाठी पुन्हा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या दिवशी बोलवले आहे.

समीर वानखेडे
समीर वानखेडे
author img

By

Published : Feb 10, 2022, 10:42 PM IST

मुंबई - क्रुझ ड्रग्ज पार्टी ( Cruise Drugs Party ) प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ( Aryan Khan Case ) अटक केल्यानंतर या प्रकरणात तत्कालीन तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांसह याप्रकरणातील पंच असलेल्या व्यक्तींनी देखील आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीतील एनसीबी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाला एसआयटीची ( Special Investigative Team ) स्थापना करत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. आता या चौकशी पथकाकडून चौकशी पूर्ण झाले असून अंतिम चौकशीसाठी पुन्हा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या तिन्ही अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या दिवशी बोलवले आहे.

क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीविरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा दक्षता तपास जवळपास पूर्ण झाला आहे. या तपासाच्या शेवटच्या फेरीत पुन्हा एकदा एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना एनसीबी दक्षता पथकाने चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे. दिल्लीतील आयर्न खान ड्रग्ज कनेक्शन प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी समीर वानखेडे, व्ही.व्ही. सिंग आणि आशिष रंजन प्रसाद या तिघांच्या चौकशीची शेवटची फेरी होणार आहे.

आशिष रंजन यांना शुक्रवारी म्हणजेच 11 फेब्रुवारीला दिल्लीत तपासाला सामोरे जावे लागणार आहे. ही त्यांची तिसरी चौकशी आहे. तर दुसरीकडे, व्ही.व्ही. सिंग यांना 12 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचवेळी दक्षता पथक 13 फेब्रुवारीला समीर वानखेडेची तिसऱ्यांदा चौकशी करणार आहे. या प्रकरणी दक्षता पथकाकडून आतापर्यंत केवळ किरण गोसावी ( Kiran Gosavi ) यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांनी त्याच्या गावात पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.

या प्रकरणाचा तपास दक्षता पथकाचे प्रमुख आणि डीडीजी एनआर ज्ञानेश्वर सिंह करत आहेत. जे तीन वेळा मुंबईत जाऊन अनेक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्याचबरोबर घटनेशी संबंधित घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजचाही या प्रकरणात बारकाईने अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

हेही वाचा - Narendra Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्याकांडातील मास्टरमाईंड तावडेचा जामिनासाठी अर्ज.. सीबीआय म्हणाले..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.