ETV Bharat / city

Sameer Khan Drug Case : समीर खान केस प्रकरणी एनसीबी एसआयटीने नोंदवला करण सजनानीचा जवाब

आर्यन खान ( Aryan Khan Drug Case ) आणि मंत्री नवाब मलिकांचे जावाई समीर खान ( Sameer Khan Drug Case ) यांची चौकशी एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात आली आहे. त्यानंतर आता एसआयटीने समीर खान यांचे मित्र करण सजनानी यांचा जवाब नोंदवला ( Nci Sit Reported Karan Sajnani Statement ) आहे.

ncb office
ncb office
author img

By

Published : Mar 24, 2022, 9:00 PM IST

Updated : Mar 24, 2022, 10:49 PM IST

मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर ( Aryan Khan Drug Case ) मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर हे प्रकरण एनसीबीच्या एसआयटीकडे सोपवण्यात आले होते. आज ( गुरुवार ) या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावाई समीर खान ( Sameer Khan Drug Case ) यांचे मित्र तसेच, आरोपी करण सजनानी यांचा जवाब एनसीबीकडून दोन तास जवाब नोंदवला ( Nci Sit Reported Karan Sajnani Statement ) आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर दिल्ली एनसीबीने एसआयटीची स्थापना केली होती. त्यामध्ये राज्यातील तीन प्रमुख प्रकरण एसआयटीला तपास करण्याकरिता देण्यात आले होते. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार घडला असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर या तिन्ही केसेस दिल्ली एनसीबी एसआयटीला देण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने नवाब मलिकांचा जावाई समीर खान, आर्यन खान आणि अरमान कोहली यांच्या प्रकरणांची चौकशी एनसीबी एसआयटीला देण्यात आली होती.

करण सजनानी एसनीबी कार्यालयात जाताना

मुंबई जवळील जहाजावर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली. याशिवाय अनेकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर अनेक हल्ले केले होते. त्यानंतर वानखेडे यांना ड्रग्ज प्रकरणातील खटल्यातून हटवण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबी एसआयटी ला देण्यात आला होता.

एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील अधिकाऱ्यांचे विशेष चौकशी पथक या प्रकरणांचा नव्याने तपास करत आहे. सहा प्रकरणे मुंबई एनसीबीकडूनच वर्ग करण्यात आली होती. परंतु, त्यातील फक्त तीनच प्रकरणांचा तपास एसआयटी करणार आहे. त्यात आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरण, नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्याशी संबंधित प्रकरण आणि अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणाचा तपास दिल्ली एसआयटी करत आहे. मुंब्रा येथील एमडी ड्रग्ज प्रकरण, जोगेश्वरी येथील चरस प्रकरण आणि डोंगरी येथील एमडी ड्रग्ज प्रकरण, अशी अन्य तीन प्रकरणे एसआयटी तपासातून वगळण्यात आले होते.

काय आहे प्रकरण? - ड्रग्ज प्रकरणात समीर खान आणि ब्रिटिश नागरिक करण सजनानी या दोघांना जानेवारी 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. दोघांकडे मोठ्या प्रमाणात सीबीडी आणि गांजा सापडल्याचा एनसीबीचा दावा होता. त्यातील एकूण 18 नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 11 नमुन्याचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले होते. एनसीबीच्या तपासात समीर खान आणि करन सजनानी यांच्यातील व्हॉइस चॅटची तपासणी करण्यात आली होती. काही आवाजाचे नमुने गोळा करून त्यांचीही पडताळणी करण्यात आली होती. आता पुढील तपासासाठी आवाजाचे नमुने नव्याने तपासावे लागणार असून, त्यासाठीच एनसीबीने कोर्टात अर्ज केला आहे. या प्रकरणात आधीच्या तपास पथकाने आरोपपत्र दाखल केलेले आहे. समीर खान आणि करन सजनानी या दोघांची जामीनावर सुटका झालेली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास सुरू झाल्यानंतर येत्या काळात बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - IPL 2022 Tournament: तपास यंत्रणांचे काही तासातच घुमजाव, आता म्हणाले आयपीएल स्पर्धेवर दहशतवादी सावट नाही

Last Updated : Mar 24, 2022, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.