मुंबई - मराठा आरक्षण संदर्भात खासदार संभाजीराजे हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज (27 मे) सकाळी 9 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे.
हेही वाचा - whatsapp ban in india व्हॉट्सअॅपचे केंद्राला आव्हान, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
- मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांचा महाराष्ट्र दौरा
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला 24 मे पासून सुरूवात झाली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला वंदन करून दौऱ्याला सुरुवात झाली. मराठा आरक्षणाचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे राज्यभर दौरा करत आहेत.
- सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण केले होते रद्द
मराठा समाजाला शैक्षणिक प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 5 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मराठा आरक्षण अवैध असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता. मात्र, ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध राहतील, असा निर्वाळाही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिला होता.
हेही वाचा - या वर्षातील अखेरचा सुपरमून आज बुधवारी दिसणार!