मुंबई : अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काही दिवसापूर्वी एक धमकीच पत्र मिळालं होतं threat letter to Salman khan. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याचा Lawrence Bishnoi threat to Salman Khan सहकारी कपिल पंडितने सलमानच्या घरी जाऊन रेकी Sharpshooter reiki Salman Khan house केल्याचं कबूल केलं होतं. या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी सर्वांच्या घराची सुरक्षा वाढवली Salman khan house security increased आहे. लॉरेन्स यांच्या निशाणावर अभिनेता सलमान खान Actor Salman Khan targeted by Lawrence Bishnoi असल्याचे स्पष्ट झाले असून बिश्नोई टोळीने त्याला दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आणि पंजाब पोलिसांनी काल अटक केलेल्या आरोपींनी केलेल्या खुलासानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवण्याबाबत आढावा घेण्याचे ठरवले, असल्याचे सूत्राने सांगितले आहे.
कपिल पंडितचे धक्कादायक खुलासे - पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्तेमध्ये सहभागी असलेला आरोपी कपिल्याने पंजाब पोलिसांकडे खुलासा केला की शूटर संतोष सोबत तो मुंबईत राहून रेखी करत होता. आरोपी कपिल पंडित आणि महाराष्ट्राचा शार्प शूटर संतोष जाधव रेकी करण्यासाठी अनेक दिवस मुंबईत थांबले होते. कपिलवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. या सर्वाच्या मगे लॉरेन्स याचा भाचा सचिन थापन याचा हात आहे. पंजाब पोलिसांच्या कपिल पंडितच्या चौकशीत हा खुलासा झाला आहे. पंजाब पोलिसांनीही सलमानला मिळालेल्या धमकीची चौकशी सुरू केली आहे. याच सर्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी देखील अभिनेता सलमान खान यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार आणि सुरक्षित वाढ करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे माहिती दिली.
सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढविली - अभिनेता सलमान खान यांच्या मुंबईतील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे मुंबई पोलीस आज सकाळी सलमान खानच्या घरी पोहोचले. गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई यांचा सदस्य कपिल पंडित याने आणखी दोघांसह मुंबईत सर्वांच्या घरी जाऊन रेकी केली होती हे मान्य केले आहे त्यामुळे सलमानच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो म्हणून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
सलीम खान यांना धमकीचे पत्र - सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काही दिवसापूर्वी एक धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात तुमचाही सिद्धू उसेवाला करू अशी धमकी दिली होती त्यानंतर ही सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती मुंबई पोलीस आज सलमानच्या घरी पोहोचले आहेत त्यांनी सर्वांच्या घराचा आढावा घेतला असून याबाबत विचारले असता ही नियमित प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान मुंबई पोलिसांचे एक पथक लवकरच पंजाला जाणार असून कपिल पंडित यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करून अधिक तपास करण्यात येणार आहे.
कपिल पंडितने रेकी केल्याची माहिती - लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सदस्य कपिल पंडित याने आपण संतोष यादव आणि सचिन विष्णू यांच्यासह जाऊन मुंबईतील सलमानच्या घराची रेखी केली होती अशी माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाचा गोल्डी ब्रार हा मास्टरमाइंड असल्याचेही समोर आले आहे. यासंदर्भात तिहार तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोई याला पोलिसांनी विचारले असता त्याने मात्र या संदर्भात साफ इन्कार केला आहे.
सलमानला पोलिसांकडून शस्त्र परवाना - दरम्यान या सर्व धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान याने पोलिसांकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना मागितला होता. लॉरेन्स बिश्नोई कडून आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खान याला शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे.