मुंबई : दिवाळीच्या आधी वेतन आणि सानुग्रह अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्रातील शिक्षकांनी Salary and welfare subsidy to 5 lakh teachers केली आहे. राज्यातील लाखो शिक्षकांनी कोरोना काळामध्ये मोठे योगदान दिलेला आहे. शासनाने याबाबत शिक्षकांची कदर करावी. दोन वर्षानंतर पहिलीच येणारी दिवाळी ही उत्साहाने साजरी करण्यासाठी शिक्षकांना दिवाळीचा वेतन दिवाळीच्या पूर्वी द्यावा before Diwali Demand of teachers आणि त्यासोबत सानुग्रह अनुदान देखील द्यावा, अशी तातडीची मागणी केली आहे.
सानुग्रह अनुदान द्यावे : सरकारी आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये 5 लाख शिक्षकांनी कोरोनामध्ये शासनाच्या प्रत्येक आदेशानुसार कष्ट घेऊन काम केले. गेले दोन वर्षे दिवाळी उत्साहाने साजरी करता आली नाही. मात्र यंदा दिवाळी पूर्वी ऑक्टोंबरचे वेतन दिले तर किमान, कुटुंबातील गरजा पूर्ण करता येईल. तसेच,सानुग्रह अनुदान देखील वेतनसोबत द्यावे, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले आहे.
याबाबत महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नेते शिवाजी दराडे यांनी सांगितले की, 'शासनाने आमचे सर्व शिक्षकांचे वेतन दिवाळीच्या आधी दिले पाहिजे. त्यासोबत शिक्षक आणि शिक्षकेतर मंडळींच्यासाठी सानुग्रह अनुदान जे आहे, ते बंद केलेले आहे, तेही सुरू करावे आणि तेही या वेतनासोबतच द्यावे. यामुळे अनेक शिक्षक तन-मन-धनाने जे काम करतायेत. त्यांच्या कष्टाच्या मेहनतीचे चीज होईल. शासनाने शिक्षकांच्या या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या जेणेकरून शालेय गुणवत्ता वाढीसाठी निश्चित शिक्षक अधिक जोमाने काम करतील. शिक्षकांच्या वेतनाचा मुद्दा निघाला की मंत्री महोदय म्हणतात की, 'शिक्षकांसाठी भरपूर आम्ही गुंतवणूक करतो. तर आम्हा शिक्षकांचे म्हणणे आहे की त्वरित निर्णय करावा.' तसेच शिक्षक भारती संघटनेचे नेते सुभाष मोरे यांनी देखील,'शिक्षक आणि कर्मचारी यांचे वेतन दिवाळी पूर्वी मिळाल्यास कुटुंबातील गरजा वेळेत पूर्ण करण्यास मदत होईल' असे म्हटले आहे.