मुंबई - युक्रेनमधील युद्ध परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील जे नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांची तिथे काय व्यवस्था आहे, ते पाहण्याच्या तसेच त्यांना परत महाराष्ट्रात सुखरूप घेऊन येण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी व्यवस्थित समन्वय साधावा, अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला ( Cm Thackeray On Ukraine Crisis ) दिल्या आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून उद्योग, शिक्षण, व्यवसायनिमित्त तिथे गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच, राज्याचे मुख्य सचिवांना केंद्र शासनाशी समन्वय साधून या नागरिकांशी सातत्याने संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील जे विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत त्यांची काळजी घ्यावी. यासाठी प्रशासनाने प्राधान्याने केंद्राशी बोलावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हेही वाचा - Pravin Raut remanded in judicial custody : प्रवीण राऊत यांना 7 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी