मुंबई - मुंबईचा डबेवाला आणि इंग्लंडचे शाही घराणे यांच्यात एक वेगळं ( The Royal Family of England ) नाते आहे. मुंबईच्या डबेवाला कडून इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक ( Saddened By The Death Of Queen Elizabeth ) व्यक्त करण्यात आले आहे. 2005 साली इंग्लंडचे युवराज चार्ल्स मुंबईत आले होते. त्यावेळेस त्यांनी आवर्जून डबेवाल्यांची भेट घेतली होती. मुंबईच्या घरातून डबा घेऊन तो कार्यालयात व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा डबेवाल्यांचा कौशल्याचा प्रिन्स चार्ल्स ( prince charles) यांनी तोंड भरून कौतुक केले होते. जेव्हापासूनच डबेवाला आणि इंग्लंडच्या घराण्याचं एक वेगळं नातं पाहायला मिळत. त्यामुळेच एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची ( Britains Queen Elizabeth passes away ) बातमी ऐकल्यानंतर मुंबईच्या डबेवाला यांना अतीव दुःख झाले. असे मुंबईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष स्थलेकर यांनी सांगितले आहे.
प्रिन्स चार्ल्स यांना किंग चार्ल्स तिसरे म्हणून संबोधलं जाईल - डबेवाल्यांचे मित्र असलेले चार्ल्स (प्रिन्स ऑफ वेल्स) हे आता राजा झाले आहेत. प्रिन्स चार्ल्स हे राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स फिलिप यांचे सगळ्यात मोठे पूत्र असल्यामुळे सिंहासनावर बसण्याचा मान त्यांना मिळाला. सिंहासनावर बसल्यानंतर प्रिन्स चार्ल्स यांना किंग चार्ल्स तिसरे म्हणून संबोधलं जाईल. प्रिन्स चार्ल्स राजा झाला याचा सर्वात जास्त आनंद मुंबईच्या डबेवालांना झाला असल्याचे मुंबईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे.
राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने अतीव दुःख - राणी एलिझाबेथ ( Britains Queen Elizabeth ) यांची तब्येत नाजूक होती महाराणीच्या मृत्यूच्या बातमीने मुंबईतील डबेवाल्यांनवर शोककळा पसरली आहे. जेव्हा डबेवाल्यांना त्यांच्या तब्येतीबाबतची बातमी कळाली तेव्हा डबेवाल्यांनी गणपतीला प्रार्थना केली होती की राणीच्या तब्येतीत सुधारणा व्हावी. पण त्यात काही सुघारणा झाली नाही. राणीच्या निधनाच्या बातमीने डबेवाल्यांना असे वाटते की, आपल्या घरातील व्यक्तीचे निधन असल्यासारखे वाटत आहे. मुंबईच्या डबेवाल्यांचा मित्र प्रिन्स चार्ल्स यांची त्या आई आहेत. प्रिन्स चार्ल्स डबेवाल्यांना मुंबईत येऊन भेटले आणी डबेवाले प्रकाशात आले. त्या नंतर प्रिन्स चार्ल्स ने त्याचे दुसर्या लग्नाला दोन डबेवाल्यांना लग्नाला लंडनला निमंत्रित केले होते. तसेच प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले. तेव्हा मुंबईच्या डबेवाला कडून त्यांच्या नातवाला महाराष्ट्राची ओळख असलेले आणि कौटुंबिक प्रथे प्रमाणे चांदीची कंबर साखळी आणि आंगड- टोपड पाठवण्यात आले असल्याची आठवण ही सुभाष तळेकर यांनी सांगितली आहे. इंग्लंडच्या राजघराण्याची डबेवालाचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे आत्म्यास ईश्वर शांती प्रदान करो ही ईश्वर चरणी प्रार्थना प्रार्थना मुंबईच्या डबेवाला यांनी केली आहे.