मुंबई यंदाचा दसरा मेळावा कुणाचा होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले होते. शिवसेनाचा दसरा मेळावा हा पारंपारिक दसरा मेळावा असल्याने याला अधिक महत्त्व असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा असता अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटानेदेखील यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा करता अर्ज दाखल करण्यात आला होता. महापालिकेने कोणताही गटाला परवानगी न देण्याचा निर्णय दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला दणका दिला. शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळली तर शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा साजरा करण्याकरिता परवानगी मिळाली आहे.
मुंबई पोलिसांनी महापालिकेला दिलेल्या सुरक्षा संदर्भातील अहवालामध्ये असे म्हटले होते की जर कोणत्याही गटाला परवानगी देण्यात आली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यावर न्यायालयाने असे निर्देश दिले आहे की पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे. जेणेकरून कुठलेही कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याची निर्देशदेखील पोलिसांना देण्यात आले आहे. न्यायाधीश आर. के. धानुका यांच्या खंडपीठांसमोर सुरू असलेल्या आजच्या सुनावणीत ठाकरे गटाला मोठा दिलासा देत दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच महापालिका आणि शिंदे गटाला न्यायालयाने देखील आहे.
आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली- तीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असे निरीक्षण कोर्टाने नमूद केले. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहावे लागेल, असे न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होत आहे. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचे नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आज मुंबई हायकोर्टात पोहोचला. दोन्ही गटाला दसरा मेळावा घ्यायचा आहे. दोन्ही गटाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान अर्थात शिवतीर्थ येथे दसरा मेळावा घ्यायचा आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी, असा अर्ज करण्यात आला होता. पण सुरक्षेचा विचार करुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली. पण याच मुद्द्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर आज मुंबई हायोर्टात शिंदे गट, ठाकरे गट आणि मुंबई महापालिकेकडून युक्तीवाद करण्यात आला. तीनही बाजूचा युक्तीवाद संपल्यानंतर कोर्टाकडून लगेच निकाल वाचण्यात आला. मेळाव्याच्या परवानगीकरिता 22 आणि 26 दोन्ही तारखेला अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असे न्यायाधीशांनी नमूद केलं. पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असे कोर्टाने म्हटले.
दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे गटाचा पहिला विजय- शिवसेना कुणाची खरी हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या लढाईत दसरा मेळावा निमित्ताने ठाकरे गटाचा पहिला विजय झाला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याने यावर्षी होणारा दसरा मेळावा मोठ्या प्रमाणात शिवसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. 21 सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या घेतलेल्या मेळाव्यामध्ये केंद्रीय भाजप नेतृत्वासह स्थानिक नेतृत्वावर कडाडून टीका केली होती. तसेच त्यावेळी त्यांनी म्हटले होते की मी या पुढील भाषण दसरा मेळाव्यावर करणार आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या दसरा मेळावा का भाषण करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत तयारीसाठी शिवाजी पार्क मैदान दिले जाणार आपल्या अधिकारांचा दुरूपयोग केल्याचं स्पष्ट होते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदविला आहे. शिवसेना ठाकरे गटाला 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत तयारीसाठी शिवाजी पार्क मैदान दिले जाणार आहे. कार्यक्रमाची संपूर्ण व्हिडिओ रिकॉर्डिंग केली जाणार आहे. सर्व अटी आणि शर्तीचे पालन करणे याचिकाकर्त्यांना बंधनकारक असणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयान निकालात नमदू केले आहे.