ETV Bharat / city

सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझेंची उच्च न्यायालयात धाव - हेबियास कॉर्पस याचिका न्यायालयात दाखल

सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी हेबियास कॉर्पस याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

Sachin Waze's brother Sudharma Waze files habeas corpus in Mumbai High Court
सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझेंनी उच्च न्यायालयात धाव
author img

By

Published : Mar 15, 2021, 7:28 PM IST

मुंबई - सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेची एन आय ए ने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात हेबियास कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझे ह्यांचे बंधू सुधर्म वाझे ह्यांनी मुंबई न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुरावे नसतानाही सचिन वाझेंना अॅंटिलिया प्रकरणात गोवले, असा उल्लेख सचिन वाझे यांचे भाऊ सुधर्म वाझे यांनी याचिकेत केला आहे.

वरिष्ठ अधिकारी मिळून संपूर्ण प्रकरणात अडकवत असल्याचा आरोप -

सुधर्म वाझे यांनी याआधीच संपुर्ण प्रकरणात अनिश्चितता असल्याचे बोलून दाखवले होते. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतरही त्यांनी या संपुर्ण प्रकरणात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसारच आज सोमवारी सचिन वाझे यांच्या कुटूंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. काही वरिष्ठ अधिकारी मिळून मला या संपूर्ण प्रकरणात अडकवत आहेत, असा खुलासा सचिन वाझे यांनी आपल्या वॉट्स एप स्टेटसमध्ये केला होता. त्यानंतरच सचिन वाझे हे आपल्या जीवाला काही बर वाईट करून घेतील काय ? य़ा शंकांनी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

वाझेंचा प्यादे म्हणून वापर -

संपुर्ण प्रकरणातच सचिन वाझे यांना झालेली एनआयएमार्फतची अटक, त्यानंतरची देण्यात आलेली एनआयएची दहा दिवसांची पोलिस कोठडी आणि एकुणच संपुर्ण प्रकरणात त्यांच्या सहकाऱ्यांची होणारी चौकशी पाहता राज्यातील पोलिस यंत्रणेवरच विरोधकांनी प्रश्न उपस्थित करायला सुरूवात केली आहे. सचिन वाझेंचा प्यादा म्हणून वापर झाला असून खरे सूत्रधार हे समोर यायचे आहेत, असा उल्लेख राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमवारी केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.