मुंबई- गेल्या चार दिवसांपासून निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची शंभर कोटी वसुली प्रकरणात ( Sachin Waze before the Chandiwal commission ) चांदीवाल आयोगासमोर उलट तपासणी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक झाली असल्याची सचिन वाझे यांनी ( Sachin Waze confession in Chandiwal commission ) कबुली दिली आहे. चांदीवाल आयोगाने सुनावणीची (Chandiwal commission hearing on 30th Nov ) पुढील तारीख 30 नोव्हेंबर दिली आहे.
शंभर कोटी वसुली प्रकरणात ईडीने चौकशी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयाची कोठडी देण्यात आली आहे. परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर ईडीकडून देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा-Param Bir Singh : परमबीर सिंग यांच्यावरील चौकशीसाठी एसआयटी स्थापन
शंभर कोटी वसुली प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे. सह्याद्री अतिथीगृह अनिल देशमुख यांची शासकीय बंगला ज्ञानेश्वरी या ठिकाणी भेट झाल्याची कबुली सचिन वाझे ( Sachin Waze meeting with Anil Deshmukh ) यांनी दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-परमबीर सिंग यांना निलंबित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून निर्णय - दिलीप वळसे पाटील
अनिल देशमुख यांचे वकील आणि सचिन वाझे यांच्यातील प्रश्नोत्तरे ( Anil Deshmukh Advocate cross examines Sachin Waze )
अनिल देशमुख यांचे वकील- तुमची शैक्षिणक पात्रता काय ?
सचिन वाझे- मी कॉमर्स graduate आहे.
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही सायबर एक्सपर्ट आहात का?
सचिन वाझे - मी स्वत:ला समजत नाही. पण तुम्ही समजू शकता. मी कॉम्पुटर सायन्स, सायबर लॉ तसेच हॅकिंग संदर्भात ज्ञान मिळविले आहे.
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही पोलीस फोर्समध्ये भरती होताना तुमची ट्रेनिंग झाली असेल. त्यात कायद्याच्या विविध बाजू तुम्हाला सांगितल्या असतील. त्यात विविध प्रकारच्या तक्रारी आणि त्या तक्रारी संदर्भात कारवाईची procedure ची माहिती दिली असेल?
सचिन वाझे- हो.
अनिल देशमुख यांचे वकील- तुमच्या पोलीस department मधील hierarchy सांगा?
सचिन वाझे- महारष्ट्र पोलिसांचे नेतृत्व पोलीस महासंचालक करतात.
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही कोणाला रिपोर्ट करत होता.
तुमचे बॉस कोण होते ? ज्यांना तुम्ही रिपोर्ट करत होते.
सचिन वाझे- असे सांगता येणार नाही. मी सहाय्यक पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करायचो.
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही असे म्हणता की तुम्ही एक योग्य पोलीस अधिकारी आहे?
सचिन वाझे- हो
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही कर्तव्य बजावत असताना कधी चुकीचे काम केले आहे का?
सचिन वाझे- हो
अनिल देशमुख यांचे वकील- काही वेळेस तुम्हाला कायदा मोडून काम करावे लागले का?
सचिन वाझे - हो. काही दुर्दैवी प्रसंगावेळी असे झाले आहे.
अनिल देशमुख यांचे वकील- जर तुम्ही कायदा मोडून काम केले असेल तर तुम्ही एक योग्य अधिकारी कसे आहात?
अनिल देशमुख यांचे वकील- २०१८ मध्ये तुम्ही कोणत्या केस हाताळल्या का?
सचिन वाझे- मी त्यावेळी काही केसमध्ये विविध तपास यंत्रणांना तपासात मदत करत होतो.
अनिल देशमुख यांचे वकील- २०१८ निलंबित असताना तुम्हाला पोलीस दलाची मदत करण्यास कोणी सांगितले.
सचिन वाझे- बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
अनिल देशमुख यांचे वकील - महारष्ट्रात किंवा मुंबईत पोलीस दलाची तपासात मदत करण्यास तुम्हाला कोणी सांगितले जेव्हा तुम्ही suspend होतात?
सचिन वाझे-काही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
अनिल देशमुख यांचे वकील - तुमच्या २५ जूनच्या प्रतिज्ञापत्रात तुम्ही परमबीर सिंग यांना भेटले होते. तुम्हाला त्यांनी कोणत्याही दबावाखाली येऊ नका आणि कोणतेही बेकायदा काम करू नका असे सांगितले?
सचिन वाझे- मी दबावाखाली होतो.
अनिल देशमुख यांचे वकील- हे खरे आहे का ? तुम्हाला पोलीस दलात परत भरती होण्यासाठी एक समिती नेमली होती. त्यात कोण होते? माहिती द्या.
सचिन वाझे - मला त्यांची नावे माहित नाहीत.
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही परमबीर सिंग यांना कधीपासून ओळखता?
सचिन वाझे - मी ९६ सालापासून परमबीर सिंग यांना ओळखतो.
अनिल देशमुख यांचे वकील- तुमचे आणि परमबीर सिंग यांचे नात कसे होते ?
सचिन वाझे- जसे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असावे..
अनिल देशमुख यांचे वकील- तुम्ही अनिल देशमुख यांना जानेवारी २१ ला भेटले का?
सचिन वाझे - हो.
अनिल देशमुख यांचे वकील- कुठे भेट झाली ?
सचिन वाझे- मला जागा व तारीख आठवत नाही.
अनिल देशमुख यांचे वकील- अनिल देशमुख यांना भेटताना अजून कोण होते तुमच्यासोबत?
सचिन वाझे-मला आठवत नाही.
अनिल देशमुख यांचे वकील- कामकाजा व्यतिरिक्त तुम्ही अनिल देशमुखांना भेटले का ?
सचिन वाझे- नाही.
हेही वाचा-Param Bir Singh : फरार घोषित केल्याचा आदेश रद्द करण्यासाठी परमबीर न्यायालयात
ईडीकडून अनिल देशमुख यांच्या मुलाचीही चौकशी सुरू-
दरम्यान, मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा (Anil Deshmukh) मुलगा ऋषीकेश देशमुखचा सक्रिय सहभागी आहेत. वडिलांनी मिळविलेली रक्कम देणगी म्हणून दाखविण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाच्यावतीने (ED) विशेष न्यायालयात करण्यात आला आहे.