ETV Bharat / city

sachin waze cross examination - सचिन वाझेने 'या' प्रश्नाला दिलेल्या उत्तरावर सर्वच बुचकाळ्यात पडले - sachin waze clean chit

सचिन वाझे ( sachin waze cross examination ) याला अनिल देशमुख यांनी तुम्हाला बार आणि रेस्टॉरेंटकडून वसुली करण्याचे सांगितले होते का? हा प्रश्न करण्यात आला, त्यावर वाझेने आठवत नाही असे उत्तर दिल्याने सर्वचजण बुचकळ्यात पडले.

sachin waze clean chit anil deshmukh
अनिल देशमुख वसुली प्रकरण चांदिवाल आयोग
author img

By

Published : Dec 14, 2021, 7:40 PM IST

मुंबई - 100 कोटी कथित वसुली प्रकरणी चांदिवाल आयोगासमोर आज तिसऱ्या दिवशी पुन्हा सचिन वाझेची ( sachin waze cross examination ) अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून उलट तपासणी करण्यात आली. यावेळी सचिन वाझे याला अनिल देशमुख यांनी तुम्हाला बार आणि रेस्टॉरेंटकडून वसुली करण्याचे सांगितले होते का? हा प्रश्न करण्यात आला, त्यावर वाझेने आठवत नाही असे उत्तर दिल्याने सर्वचजण बुचकळ्यात पडले.

माहिती देताना वकील

हेही वाचा - Saamana Editorial On Rahul Gandhi : राहुल गांधींना हिंदूत्वाचा दिवा पेटविता आला तर स्वागतच - सामना

चांदिवली आयोगाचे कामकाज 21 डिसेंबर पर्यंत तहकूब करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सचिन वाझेला विचारण्यात आलेले प्रश्न पुढील प्रमाणे आहेत.

प्रश्न १. आपण क्राईम इंटेलिजन्स यूनिट ( ciu ) मध्ये ज्या केसचा तपास केला त्या केसमध्ये आरोपपत्र दाखल झाल आहे का?

उत्तर - माझ्या काळातील सर्व केसमध्ये आरोपपत्र दाखल केले आहेत.

प्रश्न २. ज्या केसमध्ये आपण आरोपपत्र दाखल केलेत, त्या केसेसमध्ये आपण वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय आरोपपत्र दाखल केलेत का?

उत्तर - हो.

प्रश्न ३. राजकीय व्यक्तींच्या आदेशाशिवाय, त्यांच्या आदेशाची दखल न घेता आरोप पत्र दाखल केले होते का?

उत्तर - कोणत्याही राजकीय व्यक्तींनी माझ्या तपासत हस्तक्षेप केला नाही.

प्रश्न ४. याचा अर्थ कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीने तुमच्या तपासत हस्तक्षेप केला नाही?

उत्तर - हो.

प्रश्न ५. हे आरोपपत्र सादर करताना कोणत्याही प्रकारचा गृह मंत्रालयातून काही संबंध होता का?

उत्तर - नाही.

प्रश्न ६. इतर कामात गृहमंत्रालयातून कधी ढवळाढवळ झाली होती का? तुम्हाला कधी पैशाबाबत ऑफर केली का?

उत्तर - नाही.

प्रश्न ७. कधी गृहमंत्री यांना पैसे द्यायची वेळ आली होती का?

उत्तर - नाही. माझ्यातर्फे नाही.

प्रश्न ८. तुम्ही कधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे दिलेत का?

उत्तर - नाही.

प्रश्न ९. तुम्ही अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना कधी पैसे दिलेत का?

उत्तर - नाही

प्रश्न ११. तुम्ही कुंदन शिंदे यांना ओळखता का? तुम्ही कुंदन शिंदे यांना कधी पैसे दिलेत का?

उत्तर - मला आठवत नाही.

प्रश्न १२. तुम्ही कुंदन शिंदे यांना काही दिले नाही म्हणून तुम्हाला काही आठवत नाही?

उत्तर - हो.

प्रश्न १३. अनिल देशमुख यांच्याकडील अधिकृत किंवा अनधिकृत व्यक्तींकडून तुम्हाला काही डिमांड करण्यात आली का?

उत्तर - नाही.

प्रश्न १४. अनिल देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तींनी कधी पैशांची डिमांड केली का?

उत्तर - नाही.

प्रश्न १५. अनिल देशमुख यांच्याकडून तुम्हाला कधी कोणी बार आणि हाॅटेल मालकांकडून पैसे कलेक्ट करा, असे सांगण्यात आले होते का?

उत्तर - मला आठवत नाही.

प्रश्न १६. तुम्ही बार किंवा हाॅटेल मालकांकडून पैसे गोळा केलेत का?

उत्तर - नाही.

प्रश्न १७. याचा अर्थ बार ओनर्सकडून तुम्ही कधी पैसे गोळा केलेच नाहीत?

उत्तर - हो.

हेही वाचा - Mumbai Rapper : वाचा रॅपमधून समाज प्रबोधन करणाऱ्या गली गर्लची कथा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.