मुंबई - अंबानींच्या घराबाहेरील स्फोटक आणि वाझे प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. एनआयए आणि एटीएस हे योग्यरित्या तपास करत आहेत. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. हेमंत नगराळे यांनी आज(17 मार्च) मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.
हेही वाचा - पीपीई किटमधील ती व्यक्ती सचिन वाझेच, एनआयएने केले स्पष्ट
मुंबई पोलीस एका कठीण समस्येतून जात आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांची मलिम झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकाऱयाची अपेक्षा हेमंत नगराळे यांनी व्यक्त केली आहे. वाझे प्रकऱणाता तपास योग्य दिशेने सुरू आहे. तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने तपास करत आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता बोलणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हेही वाचा - जाणून घ्या, कोण आहेत हेमंत नगराळे?