मुंबई - विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ शिवसेनेचे आमदार सचिन अहिर ( Shiv Sena MLA Sachin Ahir ) यांनी घेतली. ही शपथ घेतल्यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की विधान परिषदेत आता शिवसेनेचे संख्याबळ तेरा आमदार इतके झाले आहे. शिवसेनेचे एकूण संख्याबळ पाहता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद हे शिवसेनेकडे यांने स्वाभाविक आहे. त्यादृष्टीने अधिवेशन सुरू होताच आम्ही दावा करू आणि ते आमच्याकडेच येईल असेही सचिन आहिर यांनी सांगितले. तसेच यावेळी ते असेही म्हणाले की, शिवसेनेच्या धनुष्यबाण पक्षासोबतच राहणार ( Sachin Ahir About Shiv Sena Symbol ) आहे.
चिन्ह आमच्या सोबतच राहणार - शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत काही लोक दावा करत असले, तरीही हे चिन्ह पक्षासोबतच कायम राहील. ज्यांना पक्षाविषयी काही वाटत असते तर अशा आमदारांनी राजीनामे देऊन समोर आले असते. 1966 च्या भावनेतून आता पक्षाची नव्याने सुरुवात करावी लागेल. यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांची मानसिकता तयार ठेवावी, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याच दृष्टीने त्यांनी वक्तव्य केले होते, असेही अहिर यांनी स्पष्ट केले.
नगरसेवक नव्हे इच्छुक उमेदवार गेले - मुंबईतील सर्व माजी नगरसेवक आमच्यासोबत आहेत. ठाण्यातील काही माजी नगरसेवक हे शिंदे गटासोबत नक्की गेले आहेत. परंतु ते माजी नगरसेवक आहेत आणि आताचे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या जाण्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. कारण पक्षातील कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
पक्षावर दावा सांगता येणार नाही - शिंदे गटाने विधिमंडळ पक्षावर जरी आपला दावा सांगितला असला तरी संपूर्ण पक्षावर त्यांना दावा सांगता येणार नाही त्यासाठी अनेक कायदे आणि नियम आहेत पक्षात उभी फूट पडावी लागते मात्र तसे काहीही घडलेले नाही त्यामुळे शिवसेना पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून तो मजबूतच आहे असा दावाही अहिर यांनी केला.
नुकतेच विधान परिषदेवर हजेरी - राज्य विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या 20 जूनला निवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी देण्यात आली होती. वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नेते सचिन अहिर यांच्या नावाची चर्चा होती. शिवसेनेचे उपनेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. त्यावेळी अहिर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्रा मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी काय शब्द दिला होता. त्यानंतर नुकतेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सचिन अहिर हे निवडणूक आले होते.