ETV Bharat / city

घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का ?

हिंदूत्वाच्या मुद्यावरून भाजप शासित नसलेल्या राज्यात गळे काढणाऱ्या आणि मंदिर उघडण्याची मागणी करत घंटानाद करणाऱ्या हिंदूत्ववाद्यांवर शिवसेनेने मुंगेर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवरून निशाणा साधला आहे. बिहार येथील मुंगेरमध्ये दुर्गापुजनावेळी युवकाची हत्या झाली. मात्र, पालघर प्रकरणाप्रमाणे कोणत्याही भाजप नेत्याने आणि हिंदूत्ववादी संघटनांनी अद्याप गळे काढले नसल्याची टीका केली. मुंगेर प्रकरणात तुमची थोबाडे बंद का आहेत असा सवाल शिवसेनेने सामनाच्या संपादयकीय मधून विचारला आहे.

मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का ?
मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का ?
author img

By

Published : Oct 30, 2020, 8:25 AM IST

Updated : Oct 30, 2020, 12:02 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालये, मंदिरे अद्यापही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र, मंदिर उघडण्याची मागणी करत हिंदूत्वादी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यपालांकडे जाऊन वारंवार मंदिर उघडण्याची मागणीही केली जात आहे. मात्र कोरोनाचे संकट टळले नसल्याने राज्य सरकारने अद्याप मंदिरे उघडण्याच्या निर्णय घेतला नाही. त्यावर काही संघटनाकडून मंदिराचे टाळे तोडण्याची भाषा केली जात आहे. मात्र, या हिंदूत्ववाद्यांना आणि भाजपाला मुंगेरचा हिंसाचार आणि हिंदुत्वाचा अवमान याबाबत काही घेणे देणे नसल्याची टीका शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का

महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करून सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं- देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व हे असेच असते. भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. अशा घटनांचा तपास पोलीस निःपक्षपातीपणे करत असल्याचे हवाले देत असल्याचीही टीका शिवेसेने केली आहे.

पालघरच्या साधुंचे रक्तही उसळतेय-

‘मुंगेर’सारखे हिंदुत्वावरील, दुर्गापूजेवरील हल्ले तर दडपले जातात, पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा! बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो! अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे.

भाजपशासित राज्यात कुठेय कायदा सुव्यवस्था?

तसेच आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा राज्यांत सध्या जे घडते आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे, असा टोलाही शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

बिहारमध्ये १५ वर्षापासून जंगलराजच आहे का?

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभांत लोकांना विचारलं की, ‘‘तुम्हाला जंगलराज पुन्हा हवे आहे काय? नको असेल तर भाजप आणि जदयुला मतदान करा!’’ गेल्या पंधरा वर्षांपासून बिहारामध्ये नितीशकुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसतोय.

तर हिंदूत्ववाद्यांनी नंगानाच केला असता-

मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनाच्या वेळी पोलिसांनी गोळीबार केला. मूर्ती खेचून विसर्जन करायला लावले. गोळीबारात एकजण ठार तर पंधरा लोक जखमी झाले. पोलिसांचे हे कृत्य जनरल डायरला लाजवणारे होते, असा आक्रोश सुरू आहे. दुर्गापूजेच्या विसर्जन यात्रेत हा सर्व गोंधळ झाला व पोलिसांनी सरळ बंदुका चालवल्या. अनुराग पोद्दार हा फक्त 18 वर्षांचा तरुण त्यात मारला गेला. हीच घटना प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडली असती तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून तेथे तत्काळ राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती.

घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का ?

मुंगेरच्या रस्त्यावर भर मिरवणुकीत दुर्गा प्रतिमेची खेचाखेच पोलिसांनी केली. त्या खेचाखेचीत बेगडी हिंदुत्ववाद्यांची पीतांबरे अद्याप सुटली कशी नाहीत? की मुंगेरात दुर्गापूजेत गोळीबार झाला म्हणून महाराष्ट्र किंवा प. बंगालचे राज्य बरखास्त करा, असे त्यांचे सांगणे आहे? महाराष्ट्रातील पालघरमध्ये ‘लॉक डाऊन’ काळात दोन साधू महाराजांची हत्या झाली. हत्या जमावाने केली. त्यात पोलीसही जखमी झाले, पण त्या हत्येने महाराष्ट्रातील साधुवाद, हिंदुत्व वगैरे सगळं संपलं, महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला हिंदुत्वाशी काहीच घेणे-देणे उरले नसून शिवसेना आता ‘सेक्युलर’ झाली असल्याची आवई उठवली.

काही भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी तर त्या दुर्दैवी साधूंची ढाल पुढे करून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण केले. आज मुंगेरला दुर्गापूजेवर पोलिसी गोळीबार होऊनही हे भुंकणारे व किंकाळय़ा मारणारे थंडच आहेत. नितीशकुमारांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा, असा सूर बिहारातील भाजपवाल्यांनी काढलेला दिसत नाही. आता तुमची थोबाडे बंद का असा सवाल शिवसेनेने केला आहे.

हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदारांची मुखपट्टी डोळ्यावर-

मुंगेरातील हिंदुत्व रक्ताच्या थारोळ्यात पडले. संपूर्ण बिहारवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले, पण हिंदुत्वाचे सर्व राजकीय ठेकेदार तोंडावरची मुखपट्टी डोळ्यांवर ओढून गप्प बसले आहेत. महाराष्ट्र, प. बंगालसारख्या राज्यांत हे असे काही दुर्दैवाने किंवा अपघाताने घडले की, यांचे हिंदुत्व दक्ष आणि सावधान होते. उत्तर प्रदेशात अबलांवर बलात्कार व खून झाले, साधू आणि पुजाऱ्यांना मंदिरातच निर्घृणपणे मारले गेले. हरयाणात एका मुलीला भररस्त्यात ठार केले. त्या प्रसंगास ‘लव्ह जिहाद’चे लेबल चिकटवून मोकळे झाले.

Last Updated : Oct 30, 2020, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.