ETV Bharat / city

'हा तर उंटावरचा जलआक्रोश'.. सामनातून भाजपवर निशाणा - सामना संपादकीय जलआक्रोश मोर्चा

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत निघालेल्या जलआक्रोश मोर्चावर ( BJP Jalakrosh Morcha ) सामनाच्या संपादकीतून टीका करण्यात आली ( Saamana Criticism On BJP ) आहे. हा उंटावरचा जलआक्रोश आहे, अशा शब्दात भाजपवर टीकास्त्र सोडण्यात आले.

sanjay raut devendra fadnavis
संजय राऊत देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : May 24, 2022, 9:04 AM IST

मुंबई : औरंगाबादेत भाजपच्यावतीने काढण्यात आलेल्या जलआक्रोश मोर्चावर ( BJP Jalakrosh Morcha ) सामनाच्या संपादकीयमधून ताशेरे ओढण्यात आले आहे. या मोर्चात पाण्यासाठीची लोकांची तडफड न दिसत एखादी भव्य शोभायात्रा निघावी व आनंद उत्सव व्हावा असे वातावरण होते. औरंगाबादचे महापौर राहिलेले भागवत कराड हेही यात सहभागी होते. हल्ली भाजपवाले आंदोलन कमी अन् इव्हेन्टच जास्त करतात, हा उंटावरचा जलआक्रोश आहे, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयातून भाजपचा समाचार घेण्यात आला ( Saamana Criticism On BJP ) आहे.

काय म्हटलंय सामनाच्या अग्रलेखात..?

भारतीय जनता पक्ष हा एक गमतीशीर प्राणी आहे. कोणत्या गोष्टीचा ‘इव्हेंट’ करतील याचा भरवसा नाही. लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणे हा तर विरोधी पक्षाचा हक्कच आहे, पण हल्ली भाजपवाले आंदोलनांच्या नावाखाली इव्हेंटच जास्त करीत असतात. भाजपने संभाजीनगरात आधी औरंगजेबाच्या थडग्याचा इव्हेंट केला. तो संपला नाही तोच, पाण्याच्या प्रश्नावर ‘जलआक्रोश’ मोर्चाचे आयोजन केले. जलआक्रोश मोर्चात लोकांची पाण्यासाठी सुरू असलेली तडफड दिसणे अपेक्षित होते. पण इथे एखादी भव्य शोभायात्रा निघावी व आनंद उत्सव व्हावा असेच वातावरण होते. सजवलेल्या उंट-घोडय़ावरून शेळय़ा-मेंढय़ा हाकण्याचे काम सुरू होते. भाजपपुरस्कृत महिला नटून-सजून हातात घागरी घेऊन फुगडय़ा वगैरेचा ‘जलआक्रोश’ करीत होत्या. रिकाम्या घागरींचे नेपथ्यही चांगलेच होते. संभाजीनगरची जनता या मोर्चात सामील झाली नाही. देवेंद्र फडणवीस वगैरे नेते उतरले. भागवत कराड, रावसाहेब दानवे हे दोन केंद्रीय मंत्री भिजलेल्या गळय़ाने मोर्चात उतरले, पण जलआक्रोश मोर्चा हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी होता की पाण्याचे राजकारण करण्यासाठी होता? जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून भडकेल असा अंदाज आहे व त्यात संभाजीनगरसारखी शहरेही मागे राहणार नाहीत. लोकशाहीत जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणे, मोर्चे काढणे यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. जरूर तेव्हा शिवसेनेनेही आंदोलनांचे हे हत्यार प्रभावीपणे वापरले आहेच. किंबहुना इतर कुठल्याही पक्ष-संघटनांपेक्षा अशा जनआंदोलनाचा दांडगा अनुभव शिवसेनेच्या गाठीशी अंमळ अधिकच आहे. मात्र जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आंदोलन करत असताना त्यामागील

भूमिका व हेतूही तेवढाच शुद्ध असायला हवा. पण संभाजीनगरात निघालेल्या मोर्चाबद्दल असे म्हणता येईल काय? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जलआक्रोश मोर्चामागे खरोखरच जनहिताचा शुद्ध भाव होता की हा मोर्चा अशुद्ध व गढूळ झालेल्या राजकारणाचाच भाग होता, या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले पाहिजे. अर्थात महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने प्रांजळपणा केव्हाच खुंटीवर बांधून ठेवला असल्याने ‘जलआक्रोशा’मागील सत्य त्यांच्या मुखातून बाहेर येणे शक्य नाही. वास्तविक संभाजीनगरच्या पाणी प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच गांभीर्याने लक्ष घातले आहे आणि संभाजीनगरवासीयांना दररोज 24 तास आणि भरघोस पाणी देणाऱ्या योजनेचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. 1680 कोटींच्या या योजनेअंतर्गत पैठणचे जायकवाडी धरण ते संभाजीनगर शहरापर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू होत आहे. ही योजना कार्यान्वित होईपर्यंत संभाजीनगरच्या नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ उडणार हे कोणीच नाकारत नाही. पण हे काम संपेपर्यंत निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून कोणी राजकीय दळण दळणार असेल तर ते त्यांना लखलाभ. मुळात संभाजीनगरातील जलआक्रोश मोर्चामागे भारतीय जनता पक्षाचे राजकारण तर आहेच पण जनतेची दिशाभूल करणे हा दुसरा डाव आहे. संभाजीनगरातील पाणी प्रश्न एका रात्रीतून जन्माला आला नाही. संभाजीनगरला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्णशीर्ण झाली आणि ती बदलणे आवश्यक आहे. ती वेळेत का बदलली गेली नाही आणि या कामात अडथळे कोणी आणले हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. केंद्रात यूपीएचे सरकार असताना शिवसेनेच्या पुढाकाराने समांतर जलवाहिनीची योजना अस्तित्वात आली होती. जनतेला किफायतशीर ठरेल आणि

नियमित पाणीही मिळेलअशा पद्धतीने ती योजना राबवली गेली असती तर आज संभाजीनगरातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध झाले असते. मात्र केवळ या योजनेचे श्रेय शिवसेनेला मिळेल या पोटदुखीतून ही योजनाच बंद पाडली गेली. बरं, संभाजीनगर महापालिकेतील 25-30 वर्षांच्या सत्ताकाळात शिवसेनेबरोबर भाजपही युतीमध्ये सत्तेचा वाटेकरी होताच. शिवसेनेच्या सोबतीने भाजपचेही अनेक महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष झालेच. मग संभाजीनगरात आठवडय़ातून एकदा पाणीपुरवठा होत असल्यामुळे जो रोष निर्माण झाला आहे त्याला भारतीय जनता पक्षही जबाबदार नाही काय? पण तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीत यावरून प्रश्न विचारले जाऊ नयेत आणि आपणच कसे जनतेसोबत आहोत अशी धूळफेक करण्यासाठी जलआक्रोश मोर्चाचा हा घाट घालण्यात आला. आता केंद्रात मंत्री असलेले डॉ. भागवत कराड यांनी तर या शहराचे महापौरपद भूषविले आहे, तरीही आक्रोश करीत ते या मोर्चात सहभागी झाले हा मोठाच विनोद म्हणायला हवा. मुळात अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच पाणी हीदेखील माणसाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे केवळ संभाजीनगरच काय देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडेच पिण्याचे शुद्ध पाणी मुबलक व नियमित मिळायला हवे. पण सगळीकडेच ते मिळते काय? राज्य सरकारने संभाजीनगरला दिलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता वेगात सुरू आहे. आशिया खंडातील या सर्वात मोठय़ा योजनेचे काम संपले की संभाजीनगरला 24 तास पाणीपुरवठा सुरू होईल. संभाजीनगरच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री डोळ्यांत तेल घालून लक्ष देत असताना त्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या डोळ्यांतून ‘जलआक्रोश’ तर होणारच! संभाजीनगरात भाजपने केलेला उंटावरचा ‘जलआक्रोश’ त्यापेक्षा वेगळा कुठे आहे?

हेही वाचा : Aurangabad Water Crises : 'ही लढाई सत्ता परिवर्तनाची नाही, तर व्यवस्था परिवर्तनाची; शिवसेनेमुळेच औरंगाबादचा पाणीप्रश्न गंभीर'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.