ETV Bharat / city

105 किंकाळ्या.. म्हणजे स्वत:चे षंढत्व लपविण्यासाठी सुरू झालेले उद्योग - उद्धव ठाकरे - भाजप

सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू, ते सहा महिन्यांच्यावर टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. मात्र, भविष्य सांगण्याचा त्यांचा हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो, अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

105 किंकाळ्या.. म्हणजे स्वत:चे षंढत्व लपविण्यासाठी सुरू झालेले उद्योग - उद्धव ठाकरे
author img

By

Published : Nov 16, 2019, 7:58 AM IST

मुंबई - राज्यात सरकार स्थापन करण्यावरून वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नव्या महाशिवआघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असताना, आता भाजपकडूनही पुन्हा आमचेच सरकार येईल, अशा आरोळ्या ठोकल्या जात आहे. यांच त्यांच्या दाव्यावरून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा दावा म्हणजे १०५ किंकाळ्या आणि वेड्यांचा बाजार असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात वेड्याच्या रुग्णांत भर...

सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. ‘‘पुन्हा आमचेच सरकार!’’ अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. आम्हाला चिंता वाटते, महाराष्ट्रात वेड्याच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत, असा खोचक टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात सत्य हे भगव्याच्या तेजानेच फडकणार आहे. त्यामुळे इतके मनास लावून घेऊ नका असा प्रेमाचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू, ते सहा महिन्यांच्यावर टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. मात्र, भविष्य सांगण्याचा त्यांचा हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो, अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे.

स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग -

स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल. कालच्या राज्यकर्त्यास जनतेने वेडे किंवा मूर्ख ठरवावे हे आम्हाला बरे वाटत नसल्याचा उपरोधीक टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत विनम्रपणे त्यांच्या आमदारांना सांगितले की, बिनधास्त रहा, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येत आहे. राज्यात ज्याच्यापाशी 145 चा आकडा आहे त्याचे सरकार येईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सांगताहेत. मात्र, जे पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे सांगत आहेत त्या 105 वाल्यांनी आधीच राज्यपालांना भेटून स्पष्ट केले आहे की, आमच्याकडे बहुमत नाही! त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. स्वच्छ, पारदर्शी कारभार करण्याचे वचन देणाऱयांचा हा खोटारडेपणा आहे व तो पुनःपुन्हा उघड होत आहे. सत्तेचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन येथे कुणी जन्मास आलेले नाही. स्वतःस जगज्जेते वगैरे म्हणवून घेणारे नेपोलियन, अलेक्झांडरसारखे योद्धेही आले आणि गेले. श्रीरामालाही राज्य सोडावे लागले. औरंगजेब शेवटी याच भूमीत गाडला गेला. तेव्हा अजेय असल्याच्या गमजा उगाच का मारायच्या? असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला सुनावले.

Intro:Body:

105 किंकाळ्या.. म्हणजे स्वत:चे षंढत्व लपविण्यासाठी सुरू झालेले उद्योग - उद्धव ठाकरे

मुंबई -  राज्यात सरकार स्थापन करण्यावरून वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नव्या महाशिवआघाडीकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असताना, आता भाजपकडूनही पुन्हा आमचेच सरकार येईल अशा आरोळ्या ठोकल्या जात आहे. यांच त्यांच्या दाव्यावरून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामधून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचा दावा म्हणजे १०५ किंकाळ्या आणि वेड्यांचा बाजार असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

महाराष्ट्रात वेड्याच्या रुग्णांत भर... 

सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. ‘‘पुन्हा आमचेच सरकार!’’ अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. आम्हाला चिंता वाटते, महाराष्ट्रात वेड्याच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत, असा खोचक टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात सत्य हे भगव्याच्या तेजानेच फडकणार आहे. त्यामुळे इतके मनास लावून घेऊ नका असा प्रेमाचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू, ते सहा महिन्यांच्यावर टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. मात्र, भविष्य सांगण्याचा त्यांचा हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो, अशी बोचरी टीकाही त्यांनी भाजपवर केली आहे. 

स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग -

स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल. कालच्या राज्यकर्त्यास जनतेने वेडे किंवा मूर्ख ठरवावे हे आम्हाला बरे वाटत नसल्याचा उपरोधीक टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. 

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत विनम्रपणे त्यांच्या आमदारांना सांगितले की, बिनधास्त रहा, राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येत आहे. राज्यात ज्याच्यापाशी 145 चा आकडा आहे त्याचे सरकार येईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सांगताहेत. मात्र, जे पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे सांगत आहेत त्या 105 वाल्यांनी आधीच राज्यपालांना भेटून स्पष्ट केले आहे की, आमच्याकडे बहुमत नाही! त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. स्वच्छ, पारदर्शी कारभार करण्याचे वचन देणाऱयांचा हा खोटारडेपणा आहे व तो पुनःपुन्हा उघड होत आहे. सत्तेचा किंवा मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन येथे कुणी जन्मास आलेले नाही. स्वतःस जगज्जेते वगैरे म्हणवून घेणारे नेपोलियन, अलेक्झांडरसारखे योद्धेही आले आणि गेले. श्रीरामालाही राज्य सोडावे लागले. औरंगजेब शेवटी याच भूमीत गाडला गेला. तेव्हा अजेय असल्याच्या गमजा उगाच का मारायच्या? असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला सुनावले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.