ETV Bharat / city

बुरखा घालत नाही म्हणून पतिसह सासू-सासऱ्यांचा त्रास; पतिला केली अटक - Rupali Chandanshive

चेंबूर येथील राहुल नगर परिसरात टॅक्सी चालक पतीने वीस वर्षीय रूपाली चंदनशिवे लग्नानंतर बदललेले नाव जारा हिचा धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी टॅक्सी चालक इक्बाल शेख (वय 37) याला अटक केली आहे. याबाबत नृत्य महिलेची बहीण करुणा रॉयल यांनी तक्रार दाखल केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Sep 27, 2022, 7:54 PM IST

मुंबई - मृत महिलेची बहीण करूणाने जबाबात पोलिसांना सांगितले की, माझी बहीण रूपाली चंदनशिवे हिने इकबाल शेख याच्यासोबत गेल्या तीन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला होता. इकबालने तिचे नाव जारा असे ठेवले होते. त्यांना अली नावाचा दोन वर्षाचा मुलगा आहे. सुरुवातीस ते एकत्र राहत होते. इकबालचे पहिले एक लग्न झाले होते. इकबाल आणि त्याचे आई-वडील हे जाराला मुस्लिम धर्माप्रमाणे पेहराव करण्यासाठी आणि मुस्लिम रीतीरीवाजाप्रमाणे वागण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच, घरामध्ये हिंदीमध्ये बोलण्यास सांगत होते. त्या कारणावरून इकबाल आणि जारामध्ये नेहमी भांडण होत असे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

गेल्या सहा महिन्यांपासून जारा व मुलगा अली हे इकबालपासून वेगळे राहावयास लागले होते. जारा आणि इकबाल हे फोनवर देखील एकमेकांशी नेहमी भांडत असायचे. तेव्हा इकबालच्या आई वडिलांनी इकबालला जारापासून सोडचिट्टी घेण्यास सांगत होते. जाराही इकबालपासून वेगळी राहत होती. जारा ही सुरुवातीस दादर येथील हॉस्टेलमध्ये राहत होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती तिच्या काजल चौधरी आणि जानवी शर्मा या मैत्रिणींसोबत भाडेतत्त्वावर चेंबूर येथील मोतीलाल रहिवाशी संघ येथे राहत होती.

26 सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मी माझी आई आणि बहीण चैताली इर्शाद अब्दुल समद द शेख यांच्या घरी नागेवाडी येथे गेलो होतो. त्यानंतर, जारा जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. तिच्या गळ्यावर व हातावर जखमा होऊन रक्त येत होते. तिच्या बाजूला रक्ताने माखलेला सुरा, तिचा मोबाईल आणि चपला पडलेल्या होत्या. तेवढ्यात घटनास्थळी पोलीस आले आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

जाराला राजावाडी रुग्णालयात घेऊन जात असताना जाराने मला सांगितले की, 26 सप्टेंबरला सकाळी जारा आणि इकबाल यांचे फोनवर भांडण झाले होते. तेव्हा तिने सोडचिट्टी मागितली होती. त्यावेळी इकबाल याने तिला सोडचिट्टी न देण्याबाबत विनंती केली होती. जाराकडून मुलगा अली याची मागणी करत होता. त्या कारणावरून इकबाल याने तिला सुऱ्याने गळ्यावर वार केले असल्याचे मला तिने सांगितले उपचारा करता राजवाडी रुग्णालयात घेऊन जात असतानाच जारा गाडीतच बेशुद्ध झाली. राजावाडी रुग्णालया डॉक्टर आणि तिला तपासून मयत घोषित केले अशी माहिती पोलीस जबाबात मृत जाराच्या बहिणीने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.