ETV Bharat / city

आरटीओसंदर्भातील कागदपत्र नूतनीकरणास 31 जूनपर्यंत मुदतवाढ - Central road transport and highways

राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा कठोर निर्बंध लादत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे काही आरटीओमध्ये वाहन मालक व चालकांकडून विविध कागदपत्राच्या नूतनीकरणासाठी होणारी गर्दी धोकादायक असल्याने केंद्र शासनाने खबरदारी म्हणून देशातील इतर राज्यातही मुदत वाढ दिली आहे.

आरटीओसंदर्भातील कागदपत्र नूतनीकरणास 31 जूनपर्यंत मुदतवाढ

author img

By

Published : Mar 28, 2021, 3:37 PM IST

मुंबई - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनचालकाच्या ड्रायव्हिंग लायसन व वाहनासाठी आवश्यक फिटनेस व सर्व प्रकारच्या परमिटच्या नुतनीकरणास 31 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन चालक आणि मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वाहन चालकांना मोठा दिलासा -

राज्यातील अनेक जिल्ह्यात पुन्हा कठोर निर्बंध लादत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे काही आरटीओमध्ये वाहन मालक व चालकांकडून विविध कागदपत्राच्या नूतनीकरणासाठी होणारी गर्दी धोकादायक असल्याने केंद्र शासनाने खबरदारी म्हणून देशातील इतर राज्यातही मुदत वाढ दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 फेब्रुवारी 2021 पासून वैधता संपलेल्या वाहनचालकांना ड्रायव्हिंग लायसन्सचा नूतनीकरणासाठी आता 31जून 2021 पर्यंत सूट देण्यात आली आहे. याउलट मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संबंधित फिटनेस सर्व प्रकारचे परमिट नोंदणी आणि इतर कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 नंतर संपलेली असल्यास त्यावर कारवाई करू नये असेही, या आदेशात म्हटले आहे. संबंधित वाहन मालकांना 31 जून 2019 पर्यंत वाहन संदर्भातील कागदपत्राची नूतनीकरण करता येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत -

ऑल इंडिया मोटर ट्रांसपोर्ट काँग्रेस या माल वाहतूकदारांच्या शेखर संघटनेने केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. संघटनेने सांगितले की देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सूचनावली जारी केली आहे. याआधी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फिटनेस परवाने (सर्व प्रकारचे), चालक परवाना, नोंदणी व इतर कागदपत्रांना लॉकडाऊनमुळे 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदत वाढीमध्ये जा वाहनांच्या कागदपत्राची वैधता एक फेब्रुवारीला संपली होती. त्यांना दिलासा मिळाला होता त्यानंतर पुन्हा एकदा या कागदपत्रांच्या वैधतेस 31 जून पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा - चौकशीत सत्य पुढे येईल - गृहमंत्री अनिल देशमुख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.