ETV Bharat / city

आणीबाणीमध्ये तुरुंगात जाणाऱ्यांना केवळ शपथपत्रावर पेंशन देणे अयोग्य - जितेंद्र घाडगे

आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी आणीबाणीमध्ये तुरूंगात जाणाऱ्यांना केवळ शपथपत्रावर पेंशन देणे अयोग्य असल्याचे सांगितले आहे. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता असल्याचे घाडरे याव्ळी म्हणाले.

आणीबाणीमध्ये तुरूंगात जाणाऱ्यांना केवळ शपथपत्रावर पेंशन देणे अयोग्य
author img

By

Published : Aug 5, 2019, 7:29 PM IST

मुंबई - आणीबाणीच्या काळात तुरुंगात जाणाऱ्या व्यक्तींना केवळ शपथपत्रावर पेंशन देण्याचे आदेश राज्य सरकारचे दिले आहेत. अशा प्रकारे पेन्शन देणे अयोग्य असून यातून भ्रष्टाचार वाढेल अशी शक्यता जितेंद्र घाडगे यांनी व्यक्त केली आहे. ईटिव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले आहे.

आणीबाणीमध्ये तुरूंगात जाणाऱ्यांना केवळ शपथपत्रावर पेंशन देणे अयोग्य - जितेंद्र घाडगे

आणीबाणी विरुद्ध लढा पुकारलेल्या व्यक्तींची माहिती काही कारागृहांत उपलब्ध नाही

राज्यात स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देण्यासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सरकारी पेन्शन देण्यात येत आहे. अशाच प्रकारची पेंशन 1975 च्या काळात देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या आंदोलनादरम्यान तुरुंगात गेलेल्या व्यक्तींना केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारावर देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. या आदेशाने सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे आणीबाणीच्या कालावधीत आणीबाणीविरुद्ध लढा पुकारलेल्या व्यक्तींची माहिती राज्यातील पूर्व, पश्चिम ,दक्षिण , मध्य अशा चार विभागात असलेल्या मध्यवर्ती कारागृहात उपलब्ध नसल्याची माहिती अधिकाराखाली समोर आली आहे. असे घाडगे यांनी सांगितली आहे.

शासनाच्या निर्णयाने स्वातंत्र्य सैनिकांना एक न्याय व आणीबाणीत तुरुंगात गेलेल्यांना एक न्याय

अर्जदार व्यक्तींच्या पेंशन अर्जाची छाननी करून त्याची सत्यता पडताळण्यासाठी राज्य सरकारकडे खरी माहिती उपलब्ध नसल्याने ही पेंशन योग्य व्यक्तीला देणे प्रत्यक्षात शक्य नसल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयाने स्वातंत्र्य सैनिकांना एक न्याय व आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या व्यक्तींना एक न्याय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. असे आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी म्हटले आहे.

आणीबाणी कालावधी अटक झालेल्या व्यक्तीकडून पुरावा म्हणून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र

सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक 8 जानेवारी 2019 रोजी मंत्रालयात घेण्यात आली होती. या बैठकीत आणीबाणी कालावधी अटक झालेल्या व्यक्तीकडून पुरावा म्हणून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घ्यावे व इतर पुराव्याची मागणी करु नये असे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्याचे स्वतः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Intro:राज्यात स्वातंत्र्य सैनिकांना पेन्शन देण्यासाठी संबंधित व्यक्तींना कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सरकारी पेन्शन देण्यात येत आहे. अशाच प्रकारची पेंशन 1975 च्या काळात देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या आंदोलनादरम्यान तुरुंगात गेलेल्या व्यक्तींना केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारावर देण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याने सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आणीबाणीच्या कालावधीत आणीबाणीविरुद्ध लढा पुकारलेल्या व्यक्तींची माहिती राज्यातील पूर्व, पश्चिम ,दक्षिण , मध्य अशा चार विभागात असलेल्या मध्यवर्ती कारागृहात उपलब्ध नसल्याचं माहिती अधिकाराखाली समोर आल आहे.

Body:राज्यातील येरवडा कारागृहात आणीबाणीच्या कालावधी तुरुंगात गेलेल्या व्यक्तींबद्दल माहिती विचारली असता यात तुरुंग प्रशासनाकडे संबंधित व्यक्तींची माहिती ,त्यांच्या सुटकेची तारीख मिळून आलेली नसून काही जण अन्य कारागृहात वर्ग केल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे व नाशिक कारागृह आणीबाणीच्या काळात तुरुंगवास सोसलेल्या व्यक्तींचे पत्ते मिळून आले नाहीत तर विसापूर कारागृहात माहिती अस्पष्ट असून संबंधित व्यक्तीची सुटका दिनांक व पत्ता नमूद नसल्याची बाब समोर आली आहे. नाशिक कारागृहात आणीबाणीच्या काळात तुरुंगवास असलेल्या व्यक्तींची नावे नमूद जरी नसली तरी त्या ऐवजी "चा मुलगा" (s/o) असे नमूद असल्याचे यात दिसून आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये एकापेक्षा अधिक दावे समोर येण्याची शक्यता असल्याचं आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी म्हटले आहे

Conclusion:सन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाही करिता लढा देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याबाबत धोरण ठरविण्यासाठी राज्याच्या महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक 8 जानेवारी 2019 रोजी मंत्रालयात घेण्यात आली होती. या बैठकीत आणीबाणी कालावधी अटक झालेल्या व्यक्तीकडून पुरावा म्हणून शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र घ्यावे व इतर पुराव्याची मागणी करु नये असे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्याचं स्वतः महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केला आहे

अशा प्रकारच्या व्यक्तींच्या पेंशन अर्जाची छाननी करून त्याची सत्यता पडताळण्यासाठी राज्य सरकारकडे खरी माहिती उपलब्ध नसल्याने ही पेंशन योग्य व्यक्तीला देणे प्रत्यक्षात शक्य नसल्याचे दिसून येत आहे. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयाने स्वातंत्र्यसैनिकांना एक न्याय व आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या व्यक्तींना एक न्याय मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.

( चंद्रकांत पाटील यांचा बाईट लाइव यु 07 ने पाठवला आहे. बाईट च नाव - chandrakant patil on mahesh या नावाने. जितेंद्र घाडगे यांचा बाईट जोडला आहे. )
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.