मुंबई - मुंबईतील उरलेल्या मोकळ्या जागांचे आरक्षण बदलून बिल्डरांच्या घशात घातलं जात आहेत, असा आरोप भाजपाने केला आहे. वांद्रे पश्चिम येथील अशाच 22 भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा निषेध करीत महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी आज वांद्रे येथे निदर्शने केली. यावेळी त्यांनी बिल्डरांना आरक्षित भूखंड देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला.
भाजपचे मुंबईत आंदोलन -
मुंबईचा 2034 पर्यंतचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला. या आराखड्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियोजन समितीने अनेक आरक्षणे बदलून मुंबईकरांच्या हक्काच्या मोकळ्या जागा बिल्डरांना आंदणच दिल्या आहेत. वांद्रे पश्चिम विभागातील कार्टररोड जवळील शेर्ली राजन रोडवरील उच्चभ्रू वसाहती परिसरातील बाई अवाबाई पेट्रीट ट्रस्टच्या मोकळ्या 22 भूखंडांची आरक्षणे बदलून हे भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यात आले असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. याच भूखंडांजवळ आज आमदार आशिष शेलार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन केली आहेत.
हेही वाचा - जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना लशीला भारताकडून परवानगी, जाणून घ्या लशीचे वैशिष्ट्ये
वांद्रे पश्चिम येथील बाई अवाबाई पेट्रीट ट्रस्टच्या भूखंडावरील मैदाने, शाळा, महापालिका बाजार, वृद्धाश्रम,डिपी रोड अशी आरक्षणे बदलण्यात व रद्द करण्यात आले असून, सुमारे 1 हजार कोटींची ही सार्वजनिक हिताची मोकळी जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहेत. याबाबत नियोजन समितीने ज्यावेळी हरकती मागवल्या त्यावेळी आमदार आशिष शेलार यांनी लेखी हरकत नोंदवली होती. त्यानंतरही या हरकतींकडे दुर्लक्ष करून त्याबाबत सुनावणी न घेता ही आरक्षणे रद्द करण्यात आली असून, याकडे एक हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप शेलार यांनी केला आहे.
मोकळ्या जागांची अत्यअल्प असल्याने उरलेल्या मोकळ्या जागा वाचाव्यात तसेच आरोग्य, शाळा, बाजार, मैदाने, स्मशानभूमी, गार्डन अशा सार्वजनिक हिताची आरक्षणे विकसित व्हावीत व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात. मात्र मोक्याच्या जागांचे आरक्षण बदलून बिल्डरच्या घशात घातली जात आहेत. वांद्रे पश्चिम येथील पेट्रीट ट्रस्टच्या 1 लाख 25 हजार चौरस फूटांच्या 22 भुखंडांचे आरक्षण बदलून आणि रद्द करुन 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. खेळाचे मैदान, वृद्धाश्रम, बगीचा, शाळा आणि महापालिका मंडई यासाठी आरक्षीत ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. त्यामुळे भाजप 'मुंबई वाचवा आंदोलन' करुन मुंबईतील् असे आरक्षणे बदललेल्या जागा जनतेसमोर आणणार आहोत. मुंबईत मोकळ्या जागा वाचणे आवश्यक असताना, नगरविकास खात्याने मुंबई महापालिकेला हाताशी धरुन असे भूखंड बिल्डरच्या घशात घातले असल्याचा आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
दरम्यान, या आंदोलनात भाजपा नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत आणि भाजपाचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. याबाबत आमदार आशिष शेलार म्हणाले की, राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री पर्यावरण वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेला हाताशी धरुन मुंबईतील भूखंडांची जागांची आरक्षणे बदलून मोकळ्या जागांचा गळा घोटला जात आहे. वांद्रे पश्चिम येथील पेट्रीट ट्रस्टच्या 1 लाख 25 हजार चौरस फूटांच्या 22 भुखंडांचे आरक्षण बदलून आणि रद्द करुन 1 हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. खेळाचे मैदान, वृद्धाश्रम, बगीचा, शाळा आणि महापालिका मंडई यासाठी आरक्षित ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. आम्ही आजपासून 'मुंबई वाचवा' आंदोलन करुन मुंबईतील् असे आरक्षणे बदललेल्या जागा जनतेसमोर आणणार आहोत. मुंबईत मोकळ्या जागा वाचणे आवश्यक असताना नगरविकास खात्याने मुंबई महापालिकेला हाताशी धरुन असे भूखंड बिल्डरच्या घशात घातले आहेत, असा आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
हेही वाचा - देशाला सतत आगे बढो म्हणणारा कंडक्टरसारखा पंतप्रधान हवा; मुख्यमंत्री ठाकरेंचा मोदींना टोला