मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका ई-मेल द्वारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची तक्रार मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्या ईमेलमध्ये परमबीर सिंह हे यांनी लिहिले आहे की गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याकाठी शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, अशी धक्कादायक माहिती मला भेटलेली होती आणि त्याची कल्पना मी वरिष्ठांना दिलेली सुद्धा होती अस या ईमेलमध्ये परमबीर सिंग यांनी लिहिले आहे. त्यावरती भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी टीका केली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या सगळ्या प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा तर दिलाच पाहिजे परंतु मुख्यमंत्री कार्यालयाचे जवळचे नेते आणि मंत्री अनिल परब यांची सुद्धा या प्रकरणांमध्ये चौकशी केली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
हे ही वाचा - भाजपची महाविकासआघाडी बरखास्त करण्याची मागणी हास्यास्पद - जयंत पाटील
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे खूपच गंभीर आहेत. त्यातून महाविकास आघाडी सरकारचे खरं रूप समोर आले आहे. मी तर वारंवार महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराच्या फायली समोर आणून ठेवतो, परंतु आत्ता पोलीस पोलीस यंत्रणेतील अधिकारी या सरकारमधील भ्रष्टाचार उघडकीस आणत आहेत. त्यामुळे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, ही अशी आमची मागणी आहे. त्याकरता आम्ही आज राज्यभर आंदोलन देखील करणार आहोत.
हे ही वाचा - परमबीर सिंहांच्या लेटर बाॅम्बने सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले - संजय राऊत
गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा -
गृहमंत्र्यांनी तात्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या अत्यंत जवळचे असलेले मंत्री अनिल परब यांची देखील चौकशी झाली पाहिजे, कारण अनिल परब आणि सचिन वाझे यांच्यात व्यवसायिक संबंध होते. त्यामुळे अनिल परब यांची देखील या सगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी झाली पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे. त्यामुळे या प्रकरणांमधील जे काही सत्य आहे ते बाहेर येईल, अशी आमची आशा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.