ETV Bharat / city

ST employees agitation : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा - रामदास आठवले - रिपब्लिकन पक्ष

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईतील आझाद मैदानात संप (ST employees agitation) सुरू आहे. मंगळवारी (दि. 16) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन संवाद साधत रिपब्लिकन पक्षाचा एसटी कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.

एसटी
एसटी
author img

By

Published : Nov 16, 2021, 6:35 PM IST

मुंबई - एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा मुंबईतल्या आझाद मैदानात संप सुरू आहे. मंगळवारी (दि. 16) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला (ST employees agitation) भेट देऊन संवाद साधत रिपब्लिकन पक्षाचा एसटी कामगारांच्या संपाला जाहीर पाठिंबा दिला.

एसटी नसती तर मी पुढारी नसतो -

रामदास आठवले यांनी संपातील कर्मचाऱ्यांनाशी संवाद साधत आपल्या खास काव्यमय शैलित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एसटीचे झाले नाही विलीनीकरण, तर ठाकरे सरकारचे होणार मरण, कर्मचारी येणार नाहीत शरण, कारण सरकारचे होणार आहे मरण, अशा शब्दात आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. ठाकरे सरकारला जाग आणण्यासाठी लढा तीव्र करावा लागेल, असा इशारा देत रामदास आठवले यांनी शरद पवार यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. एसटी नसती तर मी पुढारी नसतो असेही आठवले यांनी म्हटले आहे.

आम्ही त्यांना सोबत घेणार नाही -

हे महाविकास आघाडी सरकार कधीही जाईल अशी चर्चा आहे, उद्धव ठाकरे आमच्या सोबत राहिले असते तर बरे झाले असते. पण, आता आम्ही त्यांना सोबत घेणार नाही आणि त्यांना काही देणार नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, चंद्रशेखर कांबळे, सोना कांबळे, जिल्हा अध्यक्ष संजय पवार, शिरीष चिखलकर आदी उपस्थित होते.

हे ही वाचा - Rakhi Sawant Vedio : 'देश की गद्दार है दीदी'; राखी सावंतचे कंगनावर टिकास्त्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.