ETV Bharat / city

अभिनेत्यांच्या समर्थनार्थ आरपीआय रस्त्यावर, अमिताभ बच्चनचा घारासमोर मोर्चा

author img

By

Published : Feb 20, 2021, 5:30 PM IST

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवर नेहमी टिवटिव करणारे अभिनेते आता गेले कुठे गेले, असा सवाल नाना पटोले यांनी केला होता.

आरपीआय
आरपीआय

मुंबई - महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांना शेतकरी आंदोलन आणि वाढत्या महागाईबद्दल आव्हान दिले होते. की आगामी काळात त्यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही. दरम्यान, मुंबईचे आरपीआय अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या समर्थनार्थ आणि कॉंग्रेसच्या विरोधात धरणे मोर्चा काढला आहे.

आरपीआय अध्यक्ष रमेश गायकवाड

कॉंग्रेसचा विरोध दर्शवताना रमेश गायकवाड म्हणाले की, जर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या शूटिंगवर कॉंग्रेस अडथळा आणेल तर आरपीआय त्यांना उत्तर देइल. महानयक यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी आरपीआय नेहमीच तयार असते. आज अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा निषेध केला.

काय म्हणाले होते नाना पटोले-

मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवर नेहमी टिवटिव करणारे अभिनेते आता गेले कुठे गेले, असा सवाल नाना पटोले यांनी केला होता. तसेच पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानंतर देखील हे नेते शांत कसे, असे नाना पटोले यांनी म्हटले होते. काँग्रेस सत्तेवर असताना मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री असताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे सतत ट्विटरवर त्यांच्याविरोधात लिहित असत. मात्र सातत्याने ट्विटरवर टिवटिव करणारे हे अभिनेते आता कुठे गेले. महाराष्ट्रात यांनी त्यांच्या सिनेमा आणि शूटिंगवर आणि बंदी आणणार आहोत, असे नाना पटोले म्हणाले होते.

नाना पटोले यांच्या वक्तव्याला शिवसेनेचा पाठिंबा; भाजपचा विरोध-

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोले यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. तर भाजपचे आमदार राम कदम यांनी महाराष्ट्र ही कुणा एकट्याची जहागिरी नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अ‌ॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. त्यांनी अभिनेत्यांवर टीका केल्यानंतर आमदार राम कदम, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. तर शिवेसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाना पटोलेंच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या विरोधात यूथ काँग्रेसचे आंदोलन-

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे महाराष्ट्रात चित्रीकरण आणि प्रदर्शन होऊ देणार नसल्याची भूमिका जाहीर केल्याने नागपूर ग्रामीण काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यूथ काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांची पोस्टर्स हातात घेऊन निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचा निषेध व्यक्त करत अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी, महागाईविरोधात अमिताभ, अक्षयने ट्वीट करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

देशात २००४ ते २०१४ या काळात संपुआचे सरकार अस्तित्वात होती. त्यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते मनमोहन सिंग पंतप्रधान होते. या काळात इंधनाचे दर भडकले असताना भारतीय जनता पक्षाकडून आंदोलन केले जात असताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला इंधन दरवाढीच्या विरोधात जाब विचारला होता. आता पेट्रोले दर १०० रुपयांच्या वर गेले असतानादेखील दोन्ही अभिनेते गप्प असल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील जाहीर सभेत बोलताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'सातत्याने ट्विटरवर टिवटिव करणारे हे अभिनेते आता कुठे गेले?' महाराष्ट्रात त्यांच्या चित्रपट आणि चित्रीकरणावर बंदी आणणार असल्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने पटोले यांनी दिला होता.

हेही वाचा- सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त अजून लांबणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.