ETV Bharat / city

रिपाइंची भाजपला थेट धमकी; आठवलेंना उमेदवारी न दिल्यास सत्ता विसरा.. - सत्ता

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा रिपाइंला न दिल्यास भाजप-शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर बंड पुकारणार असल्याचे रिपाइंच्या कार्यकर्त्यांना सांगितले.

मुंबई - पत्रकार परिषदेत उपस्थित रिपाइंचे कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 22, 2019, 5:14 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रामदास आठवले यांना द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) केली आहे. रामदास आठवले यांना उमेदवारी न दिल्यास रिपाइंचे कार्यकर्ते बंड पुकारतील. पंधरा वर्षांचा इतिहास आहे, रामदास आठवले जिकडे तिकडेच सत्ता असते याचा विचार करावा अन्यथा यामुळे भाजप शिवसेनेला सत्ता गमवावी लागेल असा इशारा रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मुंबई - पत्रकार परिषदेत उपस्थित रिपाइंचे कार्यकर्ते

भाजप-सेना हे सत्ताधारी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वगळून महायुतीची भाषा करतात. त्यामुळे भाजप व शिवसेनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आहे की, रामदास आठवले व त्यांचे समर्थक ज्यांच्या बाजून असतात त्यांची सत्ता येते. भाजप शिवसेना ही संधी गमावू पाहते आहे, अशीच आजची स्थिती आहे.

त्यामुळे भाजप-शिवसेनेने ईशान्य मुंबईतील जागा आठवले यांना दिली नाही तर, भाजप व शिवसेनेविरोधात उभे राहून आपली दिशा ठरवणार आहेत. भाजप व शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर बंड पुकारु, असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीधर साळवे यांनी सांगितले.

Intro:
रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईची उमेदवारी दिली नाही, तर आरपीआय कार्यकर्ते भाजपविरुद्ध बंड पुकारणार

मुंबई

रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईचे उमेदवारी देण्यात यावी यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ईशान्य मुंबई येथील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेत रामदास आठवले यांना ईशान्य मुंबईचे उमेदवारी द्यावी आव्हान केले व पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की रामदास आठवले यांना मुंबईची उमेदवारी दिली नाही ही तर भाजप व शिवसेना विरुद्ध बंड पुकारून व भाजप शिवसेनेला सत्ता गमवावी लागेल असा इशारा देण्यात आला.

काल-परवापर्यंत केवल महाआघाडीच्या द्वारे केलेले आज केवळ युतीची भाषा बोलतात. सत्ताधारी असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला वगळून महायुतीची भाषा करतात .त्यामूळे भाजप व शिवसेनेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, युतीचे मनसुबे काही औरच असावे तुमचे, परंतु हे लक्षात घ्यावे की, व पंधरा वर्षाचा इतिहास आहे की रामदास आठवले. व त्यांचे समर्थक ज्यांच्या बाजून असतात त्यांची सत्ता येथे. भाजप शिवसेना ही संधी गमावू पाहते आहे .अशीच आजची स्थिती आहे. त्यामुळे जर भाजप-शिवसेनेने ईशान्य मुंबईतील जागा आठवले साहेबांना दिली नाही तर भाजप व शिवसेनेविरोधात उभे राहून आपली दिशा ठरवणार आहेत व भाजप व शिवसेनेला सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रभर बंड पुकारु व त्यांना सत्ता गमावण्यासारखं काहीतरी करू असे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रीधर साळवे यांनी सांगितले

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.