ETV Bharat / city

पाच वर्षात आरपीएफने केली 1 हजार 874 घरातून पळून आलेल्या मुलांची सुटका

कौटुंबिक वाद, पालकांबरोबर न पटणे, बॉलीवुडचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या 141 मुलांना गेल्या एका वर्षात त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्याचे काम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे.

घरातून पळून आलेल्या मुलांची सुटका
घरातून पळून आलेल्या मुलांची सुटका
author img

By

Published : Apr 5, 2021, 4:48 PM IST

Updated : Apr 5, 2021, 6:19 PM IST

मुंबई - कौटुंबिक वाद, पालकांबरोबर न पटणे, बॉलीवुडचे आकर्षण अशा अनेक कारणांमुळे घरातून पळून जाणाऱ्या 141 मुलांना गेल्या एका वर्षात त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्याचे काम मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे सुरक्षा बलाने केले आहे. तर मागील पाच वर्षांत म्हणजेच 2016 पासून 31 मार्च 2021 पर्यंत, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात 1 हजार 874 मुलांना वाचविण्यात आरपीएफला यश आले आहे.

मुलांचा सर्वाधिक समावेश...
मुंबईतील विविध स्थळांचे आकर्षण, ग्लॅमर दुनिया, सेलिब्रेटींना भेटण्याच्या इच्छेखातर, पालकांना कंटाळून, मानसिक त्रासातून मुक्त होण्यासाठी लहान मुले मुंबईमध्ये येतात. मात्र, मुंबईतील गर्दीमध्ये अशी लहान मुले हरवतात. या मुलांना विश्वासात घेऊन, त्यांची विचारपूस करून त्यांची घरवापसी केली. अथवा सामाजिक संस्थामध्ये रवानगी केली आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाने 141 मुलांची सुटका केली आहे. त्यात मुंबईच्या मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांमधील 92 मुले आणि 49 मुलींचा समावेश आहे.

हेही वाचा - परभणी जिल्ह्यात डिवायएसपींच्या जीपला अपघात; ठेकेदारासह अभियंत्यावर गुन्हा दाखलपाच वर्षात १,८७४ मुलांना वाचविले..

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ पर्यंत मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाने १४१ मुलांची सुटका केली. त्यात मुंबईच्या मध्य रेल्वे स्थानकांमधील ९२ मुले आणि ४९ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मुलांना पालकांशी पुन्हा भेटवण्यात आले. २०१६ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १,८७४ मुलांना वाचविण्यात आले.

हेही वाचा - तरुणाचा धारदार हत्याराने खून; जखमी अवस्थेत दुचाकीवरून जाण्याचा प्रयत्न अयशस्वी

अनेक पालकांनी मानले आभार...
ही मुले आरपीएफला प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ फिरताना आढळली. ही मुले जेव्हा सापडली तेव्हा प्रशिक्षित रेल्वे संरक्षण दलाने त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांच्या पालकांसह पुन्हा एकत्र येण्याचा सल्ला दिला. अशा प्रकारे काळजीत असलेल्या पालकांपर्यंत मुले पोहोचल्यामुळे सल्लागार म्हणून त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ठरली आहे. अनेक पालकांनी रेल्वे संरक्षण दलाच्या उदात्त सेवेबद्दल मनापासून कृतज्ञता व आभार व्यक्त केले आहे.

Last Updated : Apr 5, 2021, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.