ETV Bharat / city

BMC Road Google Map : मुंबईतील रस्ते बंद असल्याची माहिती आता 'गुगल मॅप'वर मिळणार

नागरिक आणि चालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून जे रस्ते दुरुस्तीकामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती आता 'गुगल'ला अधिकृतपणे कळविण्यात येणार आहे. यामुळे 'गुगल मॅप'वर रस्ता शोधताना नागरिकांना रस्ता बंद असल्याचे शिवाय त्याला पर्यायी मार्गही 'गुगल मॅप'द्वारे सहजपणे कळणार आहे, अशी माहिती पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक, सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

author img

By

Published : Apr 22, 2022, 8:58 PM IST

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

मुंबई - मुंबईत प्रवास करताना अनेक नागरिक, चालक गुगल मॅपचा वापर करतात. मुंबईत अनेक रस्त्यांची कामे सुरु असल्याने त्याची माहिती मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. नागरिक आणि चालकांची गैरसोय होऊ नये, म्हणून जे रस्ते दुरुस्तीकामांसाठी बंद ठेवण्यात येतील, त्यांची माहिती आता 'गुगल'ला अधिकृतपणे कळविण्यात येणार आहे. यामुळे 'गुगल मॅप'वर रस्ता शोधताना नागरिकांना रस्ता बंद असल्याचे शिवाय त्याला पर्यायी मार्गही 'गुगल मॅप'द्वारे सहजपणे कळणार आहे, अशी माहिती पालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक, सहायक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

प्रयोग यशस्वी : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जे रस्ते विविध दुरुस्ती कामांसाठी बंद असतील, त्यांची माहिती महानगरपालिकेद्वारे अधिकृतपणे 'गुगल'ला लेप्टन या संस्थेच्या सहकार्याने कळविण्यात येणार आहे. ही माहिती कळविल्यानंतर त्या पुढील २४ तासांमध्ये ही माहिती 'गुगल मॅप'वर अद्ययावत केली जाणार आहे. या अनुषंगाने चाचणी स्वरुपात दक्षिण मुंबईतील 'गणपतराव कदम मार्ग' येथे सुरू असलेल्या कामांची माहिती 'गुगल'ला कळविण्यात आली होती. ज्यामुळे गुगल मॅपवर आता सदर ठिकाणी लाल रंगातील ठिपक्यांची रेषा दिसत आहे. या रेषेवर 'क्लिक' केल्यानंतर सदर रस्ता बंद असल्याचा कालावधी देखील दिसत आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे याच धर्तीवर भविष्यात जे रस्ते बंद असतील, त्यांची माहिती 'गुगल'ला कळविण्यात येणार आहे, अशी माहिती उघडे यांनी दिली.

इतर रस्त्यांची माहितीही गुगल मॅपवर देण्याचे नियोजन : यापूर्वी 'कोविड -१९' या साथ रोगाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 'कंटेनमेंट झोन'ची माहिती महापालिकेच्या पुढाकाराने व 'गुगल'च्या सहकार्याने नागरिकांना 'गुगल मॅप'वर उपलब्ध करून देण्यात आली होती. याच धर्तीवर भविष्यात मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांच्या कामांव्यतिरिक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एम एम आर डी ए), वाहतूक पोलीस यंत्रणा यांच्या सहकार्याने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर रस्त्यांची माहिती देखील गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्याचे महानगरपालिकेचे नियोजन आहे, असे उघडे यांनी सांगितले.

हेही वाचा - Special code language in UP : वाराणशीतील गंगेच्या घाटावर नाविक बोलतात सांकेतिक भाषा, जाणून घ्या, भाषेचे रहस्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.