ETV Bharat / city

मुख्यमंत्री शिंदे- प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी; 'हे' आहे प्रकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यातील वाद नवा नाही. आता ओवळा माजीवाडा मतदारसंघावरून Ovala Majiwada Constituency दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. सरनाईक यांनी हा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकायला सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार शब्दांत खडाजंगी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Maharashtra Politics
Maharashtra Politics
author img

By

Published : Sep 29, 2022, 5:02 PM IST

Updated : Sep 30, 2022, 12:06 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde आणि प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्यातील वाद नवा नाही. आता ओवळा माजीवाडा मतदारसंघावरून Ovala Majiwada Constituency दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. सरनाईक यांनी हा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराकरिता सोडावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दबाव टाकायला सुरुवात केल्याने दोघांमध्ये जोरदार शब्दांत खडाजंगी झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर असलेल्या सरनाईक यांच्या विरोधात पुन्हा एकदा चौकशीचा फार्स आवळण्याच्या हालचाली सुरू होण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

बंडखोर नेते rebel leader आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांच्या विरोधात सुरत मध्ये जाऊन बंड पुकारले. एकेकाळचे शिंदे यांचे कट्टर विरोधक प्रताप सरनाईक या बंडात आघाडीवर होते. विविध प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढल्याने सरनाईक शिंदे सोबत गेल्याची चर्चा होती. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानभवनात केली. सरनाईक आणि मुख्यमंत्री शिंदे यानंतर अनेक कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र दिसून आले. एकमेकांचे विरोधक असलेल्या शिंदे आणि सरनाईकांमध्ये आता सगळं आलबेल असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, दोघांमधील शीतयुद्ध आता नव्याने धुमसत आहे.

ओवळा- माजीवाड़ा मतदारसंघात पकड 1997 ला राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले प्रताप सरनाईक यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ते ठाण्यातील ओवळा- माजीवाडा मतदारसंघातून आमदारही झाले. याच मतदारसंघातून ते सलग तीनवेळा म्हणजे 2009, 2014 आणि 2019 साली आमदार म्हणून विधानसभेत निवडून आले आहेत. हा मतदारसंघ केवळ ठाणे महानगरपालिकेपुरता मर्यादित नाही. तर मीरा- भाईंदर महानगरपालिकेमध्ये देखील त्याचा काही भाग येतो. ठाण्यातील लोकमान्यनगर, वर्तकनगर शास्त्रीनगर, शिवाजीनगर अशा बैठ्या चाळीच्या मध्यम आणि गरीब वर्गाच्या विभागापासून ते थेट वाघबीळ, कासारवडवली, माजिवडा, गायमुखपर्यंतचा भाग याच मतदारसंघांमध्ये येतो. तर दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विभागातल्या चेन्ना गाव, घोडबंदर गाव, वर्सोवा, काशिमिरा, गोल्डन नेक्स्ट, नवघर हे विभाग देखील ओवळा माजिवडा याच मतदारसंघात येतात. येथे सरनाईक यांची मजबूत पकड आहे.

शिंदे आणि सरनाईकांमधील संबंध ताणले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांना शिंदे गटाचे प्रमुख नेते मानले जातात. शिंदे यांचा शब्द अंतिम करण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. येत्या पाच दिवसांत दसरा मेळावा होणार असून यासाठी गर्दी जमण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. असे असताना मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांचा ओवळा माजीवाड़ा मतदार संघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी सरनाईक यांच्या निकटवर्तीयांना फोडण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत. सरनाईक यांना ही बाब कळताच, त्यांनी थेट शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जाब विचारला. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील उडाल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

प्रताप सरनाईक शिंदेंपासून चार हात लांब शिवसेनेतील बंडखोरी नंतर प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने एकाच मंचावरती उपस्थित असायचे. सध्या दोघांमध्ये बिनसल्याने दोघेही एकमेकांपासून अंतर ठेवून आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभी नाक्यावर बसवलेली देवी सुप्रसिद्ध आहे. या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला होता. शिवसेना आणि शिंदे गटाचे संबंध ताणले गेले असताना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार शिंदे देखील यावेळी उपस्थित होते. मात्र, बंडखोरीनंतर एकत्र दिसणारे प्रताप सरनाईक आणि शिंदे कुठेही सोबत दिसले नाहीत. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यापासून फारकत घेऊन चार हात लांब राहत असल्याचे बोलले जात आहे.

Last Updated : Sep 30, 2022, 12:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.