मुंबई: Rikshaw Taxi Fare Hike: परिवहन विभागाने (Mumbai Transport Department) रिक्षाच्या भाडेवाडीला मान्यता दिल्यामुळे आजपासून मीटर 21 रुपये होते तिथे आता 23 रुपये झालेले आहे तर टॅक्सीचे भाडे 25 रुपये होते ते आता 28 रुपये झालेले आहे.
तसेच रात्री बारानंतर जर रिक्षा मधून प्रवास करायचा असेल तर दीड किलोमीटरला आधी 27 रुपये द्यावे लागत होते. आता दोन रुपये जास्त द्यावे लागणार आहे म्हणजे 29 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. तर टॅक्सी करता पूर्वी 32 रुपये द्यावे लागत होते. आता तीन रुपये त्यात वाढून 35 रुपये आता द्यावे लागणार आहे.(Increase in rickshaw and taxi fares)
रिक्षाने रोज प्रवास करणारे जनार्दन म्हात्रे या प्रवाशाची बातचीत केली असता, ही भाडेवाढ सामान्यांना परवडणारी नाही पण काय करणार; अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तर रिक्षा टॅक्सी मेंट्स युनियन नेते शशांकराव यांनी सांगितले की, खटूआ समितीने जी सवलत सांगितलेली आहे.
त्यानुसार सीएनजी गॅस मध्ये 40 टक्के सवलत दिल्यास लोकांवर दरवाढीचा बोजा पडणार नाही. मात्र शासनाने हे समजून घेतलेले नाही त्यामुळेच आम्ही म्हणतो ही दरवाढ तुपुंजीच आहे. शासनाने परस्पर सीएनजी कंपनीला यामधला फरक दिला तर ही दरवाढ जनतेच्या माथी बसणार नाही.