मुंबई - रिक्षा-टॅक्सीची घटलेली प्रवासी संख्या आणि त्यामुळे तुटपुंज्या कामामुळे रिक्षा टॅक्सी चालकाकडून मीटर रिकॅलिब्रेशनकडे पाठ फिरवल्याचे चित्र मुंबई आणि महानगरात दिसून येत आहे. भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतरही 1 मार्चपासून मुंबई आणि उनगरातील जेमतेत 32 हजार रिक्षा व टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशन केले आहेत. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील रिक्षा व टॅक्सी चालकाकडून नव्या भाडेवाढीला बगल देत असल्याचे चित्र ईटीव्ही भारतच्या ग्राउंड रिपोर्टमधून समोर आले आहे.
मीटर रिकॅलिब्रेशनचे पैसे माफ करावेत-
मुंबईत दररोज कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असून कधीही लॉकडाऊनची घोषणा होईल अशी भीती चालकांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत ही रिकॅलिब्रेशनचे शुल्क भरून दोन दिवस व्यवसाय बंद ठेवणे चालकांना परवडणारे नाही. मुळात कोरोनाच्या निर्बंधामुळे रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांसाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक गणितही बिघडलेले आहे. अशा परिस्थितीत रिकॅलिब्रेशन प्रक्रियेस लागणारा शुल्क राज्य सरकारने माफ करावेत. दिल्ली सरकारने लॉकडॉन काळात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना पाच हजार रुपयाची मदत केलेली होती. मात्र, महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना राज्य सरकारकडून मदत केली नाही. त्यामुळे आतातरी राज्य सरकारने आम्हाला मीटर रिकॅलिब्रेशनसाठी सूट द्यावीत, अशी प्रतिक्रिया टॅक्सी चालक विकास पवार यांनी दिली आहे.
हेही वाचा - टीआरपी घोटाळा : अर्णबबाबत तपास यंत्रणांची भूमिका काय? मुंबई उच्च न्यायालय
कंपनीकडे चीप उपलब्ध नाही?
टॅक्सी चालक गणेश शेटे यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, टॅक्सी रिक्षाचे भाडेवाढ केली असली तरी, नवीन भाडेवाढीसाठी मीटर रिकँलिब्रेशन करावेत लागते. मात्र, टॅक्सी मीटर अद्यावत करण्यासाठी लागणारी चिप कंपनीकडे उपलब्ध नाही. त्यामुळे परिवहन विभागाने तात्पुरते नवीन भाडेवाढ आकारण्याठी नव्या दराचा कागदी तक्ता देण्यात आलेला आहे. परंतु, डिजिटल मीटर वेगळी रक्कम दिसत असताना कांती तर त्याप्रमाणे भाडे देण्यास प्रवासी नकार देत आहे. त्यामुळे आम्हाला जुन्या दरानुसार प्रवासी भाडे आकारावा लागत आहे. एकतर कोरोनाचा रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे टॅक्सीच्या प्रवासी संख्येत घट झालेली आहे. ज्याप्रमाणे दिल्ली सरकारन टॅक्सी व रिक्षा चालकांना मदत केली होती. त्याच धर्तीवर आम्हाला सुद्धा राज्य सरकारने मदत करावीत.
675 टॅक्सी चालकांचे मीटर रिकॅलिब्रेशन-
मुंबईत आतापर्यंत फक्त 675 टॅक्सी चालकांनी मीटर रिकॅलिब्रेशन केली आहे. त्यात मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये 222, वडाळा आरटीओत 429, बोरिवली 18 आणि पनवेल आरटीओमध्ये 6 टॅक्सी चालकांनी रिकॅलिब्रेशन केले आहे. याउलट मुंबईतील 4 आरटीओसह ठाणे, पनवेल, वसई, नवी मुंबई, कल्याण,पने या एकून 10 आरटीओमध्यें 31 हजार 468 रिक्षाचे मीटर रिकॅलिब्रेशन केले आहेत. मात्र महामुंबईतील 4 लाखाहून अधिक रिक्षा व 40 हजारांहून अधिक टॅक्सीचालकांनी अजूनही रिकॅलिब्रेशनसाठी तयार नाही. रिक्षा व टॅक्सी संघटनांनी सरकारने केलेल्या भाडेवाढीला विरोध दर्शविला होता. म्हणूनच 31 मे पर्यंत टॅक्सी-रिक्षाच्या मीटरचे रिकॅलिब्रेशन होणे तूर्तास तरी कठीण दिसून येत आहे.
हेही वाचा - ६७वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : 'छिछोरे' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट; तर मराठीमध्ये 'बार्डो'ची बाजी