मुंबई - सोमवारी एनसीबी कार्यालयात चौकशी करून रिया थेट वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली. यानंतर तिने येथे निवेदन दिले आहे. दरम्यान, रिया वांद्रे पोलिस स्थानकात जवळपास 4 तासांहून अधिक काळ उपस्थित होती.
रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूतची बहीण प्रियंका सिंह, राम मनोहर लोहिया हॉस्पिटल दिल्लीचे डॉ. कुमार कुमार आणि इतरांवर बनावट, एनडीपीएस अॅक्ट आणि टेलिमेडिसिन प्रॅक्टिस मार्गदर्शक तत्वे -२०२० अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. प्रियंकाने सुशांतला व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या औषधांच्या प्रिस्क्रिप्शन संदर्भात रियाने 8 जून रोजी ही एफआयआर केली आहे. हा फॉर्म मिळाल्यानंतर पाच दिवसांनी सुशांतचा मृत्यू झाल्याचा तीचा आरोप आहे.
गुन्हा दाखल करण्याबाबत सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले, मुंबई पोलिसांकडे याप्रकरणाची कार्यकक्षा कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. तर सुशांतसिंह प्रकरणातील तक्रारींचा तपास सीबीआय करेल, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी तक्रार स्वीकारल्यास हा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आणि कोर्टाचा अवमान होईल. वांद्रे पोलिसांनी याची चौकशी केली तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.