ETV Bharat / city

मुंबईतील विविध कामांचा मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्याकडून आढावा

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.

mumbai
कामांचा मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्याकडून आढावा
author img

By

Published : May 24, 2021, 7:34 PM IST

मुंबई - तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्वीची विविध कामे यांचा आढावा मंत्री अस्लम शेख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून घेण्यात आला.

mumbai
कामांचा मंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख यांच्याकडून आढावा

हेही वाचा - सिप्ला 'या' औषधाची करणार विक्री; मृत्यूदर कमी होत असल्याचा दावा

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई शहरातील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. विशेषतः तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विविध झोनचे उपायुक्त, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तौक्ते वादळामुळे शहरातील मच्छिमारांच्या बोटींच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात त्यांना मदत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सर्व पातळ्यांवर सुसज्जता करावी. शहरात सध्या लसीकरण सुरू असून लसीकरण केंद्रांवर कार्यालय किंवा इतर कोणत्याही प्रकारचे इतर उपक्रम सुरू ठेवू नयेत, अशा सूचना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख त्यांनी दिल्या.

शहरामध्ये मान्सूनपूर्व कामांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी, विशेषतः जिथे पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत तेथील राडारोडा हलविणे आदी कार्यवाही करण्यात यावी. कोस्टल रोड किंवा मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात कुठे पाणी साचणार असेल तर अशा ठिकाणी पाणी साचू नये यासाठीची व्यवस्था करण्यात यावी. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुरेशा आरोग्य सुविधांची उपलब्धता करणे, आयसीयू बेड्स, ऑक्सीजन बेड्स याबरोबरच पेडियाट्रिक ट्रीटमेंट सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनाविषयक मदतीसाठी शहरात प्रत्येक वॉर्डकरिता सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांकांना त्या त्या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारने सारथीची वाट लावली - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.