ETV Bharat / city

अनलॉक 1.0 : हळूहळू मुंबईत स्थलांतरित मजुरांचे 'रिव्हर्स मायग्रेशन' सुरू - mumbai city latest news

मुंबईत कोरोनाने थैमान माजवले होते. त्यामुळे इतर राज्यांमधून या शहरात आलेले मजूर काही दिवसांपूर्वी मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी जाताना दिसत होते, प्रसंगी पायपीट देखील पत्करत होते. पण आता हे चित्र बदलताना दिसत आहे. शहरातील व्यवसाय आणि कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. त्यामुळे इतर राज्यांमध्ये गेलेले नागरिक आता परत येताना दिसून येत आहे.

Reverse migration of migrant workers begins in Mumbai city
मुंबईत स्थलांतरित मजुरांचे 'रिव्हर्स मायग्रेशन' सुरू
author img

By

Published : Jun 8, 2020, 5:03 PM IST

Updated : Jun 8, 2020, 5:19 PM IST

मुंबई - शहर आणि परिसरात कोरोनाने थैमान माजवले होते. त्यामुळे इतर राज्यांमधून या शहरात आलेले मजूर काही दिवसांपूर्वी मिळेल त्या वाहनाने आपापल्या गावी जाताना दिसत होते, प्रसंगी पायपीट देखील पत्करत होते. पण आता हे चित्र बदलताना दिसत आहे. शहरातील व्यवसाय आणि कार्यालये टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत. त्यामुळे इतर राज्यांमध्ये गेलेले नागरिक आता परत येताना दिसून येत आहे.

मुंबईत स्थलांतरित मजुरांचे 'रिव्हर्स मायग्रेशन' सुरू

विशेष एक्सप्रेसने काही लोक मुंबईला येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या त्यांची संख्या कमी असली तर त्याला सुरवात मात्र झाली आहे, असे म्हणता येईल. पूर्वीसारख्या मुंबईला येणाऱ्या गाडीतून फारशी गर्दी दिसत नसली तरी हळूहळू का होईना रिव्हर्स मायग्रेशन मजूर (स्थलांतरित मजूर) परतायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा... अनलॉक १ : पहिल्याच दिवशी पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबईत रिव्हर्स मायग्रेशनला सुरवात, उत्तर प्रदेशातील लोक दाखल...

लॉकडाऊनमध्ये मुंबई बाहेर गेलेले स्थलांतरित मजुरांनी पुन्हा हळूहळू मुंबईच्या परतीच्या दिशेने वाट धरली आहे. उत्तर प्रदेश मधून वाराणसी ट्रेनने मुंबईत काही प्रमाणात स्थलांतरित मजूर मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईत लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मुंबईबाहेरील मजुरांनी रोजी रोटीसाठी मुंबईकडेच परतायला सुरुवात केली आहे. हळूहळू मुंबईत येणाऱ्या मजुरांची संख्या वाढणार यात काही शंका नाही. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईत परतणाऱ्या लोकांची संख्या आणखी वाढेल असे दिसून येते.

मात्र, यात एक महत्त्वाचे म्हणजे मुंबईत आल्यावर स्टेशनवर गाडीतून उतरताच कोणत्याही मजुराच्या हाताला होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लगेच नोकरीवर जाणे या लोकांना शक्य होणार आहे. त्यांना विलगिकरणाच्या १४ दिवसांच्या प्रदीर्घ प्रोसेसला सामोरे जावे लागणार नाही. स्टेशनवर उतरल्यावर मुंबईत आलेल्या प्रवाशांचे फक्त स्क्रीनिंग केले जातव आहे. त्यानंतर त्यांना घरी जाऊ दिले जात असल्याचे ईटीव्ही भारतने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

'लॉकडाऊनमध्ये गावाला गेलो होतो. मात्र आता मुंबईत काम असल्याने पुन्हा मुंबईकडे आल्याचे' एका इमारतीत वॉचमन म्हणून कार्यरत असलेल्या लोकेश द्विदेदी यांनी म्हटले. 'लॉकडाऊनमध्ये गावी गेलो होतो, मात्र आता मुंबईत काम सुरू होत आहे. त्यामुळे पुन्हा गॅरेजमध्ये कामासाठी आल्याचे' एका वाराणसी येथून आलेल्या मजूराने सांगितले.

Last Updated : Jun 8, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.